अभिनेता वरुण धवनचा ‘भेडिया’ चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात क्रिती सेनॉनसह अभिषेक बॅनर्जी, सौरभ शुक्ला, दीपक डोबरियाल यांसारखे कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये आहेत. ‘स्त्री’ आणि ‘रूही’ नंतर दिनेश विजानचा ‘भेडिया’ हा तिसरा हॉरर कॉमेडी चित्रपट आहे. वरुण बॉलिवुडमधील आजचा आघाडीचा अभिनेता आहे. त्याच्या चाहत्यांसाठी आता आनंदाची बातमी समोर आली आहे.
प्रसिद्ध अशा मादाम तुसाँ संग्रहालयामध्ये बॉलिवूडमधील अमिताभ बच्चन, शाहरुख खान, ऐश्वर्या राय यांचे मेणाचे पुतळे आहेत. आता यात आणखीन एका बॉलिवूड अभिनेत्याची भर पडली आहे ती म्हणजे वरुण धवनची. त्याचा मेणाचा पुतळा दिल्लीमधील DLF मॉल ऑफ इंडियाच्या चौथ्या मजल्यावर असणाऱ्या संग्रहालयात हा ठेवण्यात येणार आहे. मादाम तुसाँ संग्रहालयाच्या ट्वीटर अकाऊंटवरून ही माहिती देण्यात आली आहे.
“आलिया हॉलिवूडला गेली तर मी….” रणबीर कपूरच्या वक्तव्याने उंचावल्या भुवया
बॉलिवूडमधील सर्वात कमी वय असलेल्या अभिनेत्याचा पुतळा म्हणून याकडे बघितले जात आहे. वरुण धवनने अवघ्या काही वर्षातच बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाने आपले स्थान निर्माण केले आहे. वरुण धवनचे वडील डेव्हिड धवन हे बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक आहेत.
दिग्दर्शक करण जोहरच्या ‘स्टुडंट ऑफ द इयर’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या वरुण धवनने ‘कलंक’, ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’, ‘बदलापूर’, ‘हम्प्टी शर्मा की दुल्हनिया’ अशा सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे.