बॉलीवूडसाठी वाद नवे नाहीत. अफेअर्स, फसवणूक, विवाहबाह्य संबंध, मनी लाँडरिंग, बेकायदेशीर गोष्टी आणि मारहाण अशा अनेक गोष्टी इंडस्ट्रीत घडतात. प्रायव्हेट डिटेक्टिव्ह तान्या पुरी हिने तिच्या करिअरमधील काही विचित्र प्रसंगांबद्दल सांगितलं आहे. एक बॉलीवूड अभिनेत्री चाहत्यांना अनेक वर्षांपासून मूर्ख बनवत आहे, असा खुलासा तान्याने केला आहे.

सिद्धार्थ कन्ननच्या पॉडकास्टमध्ये तान्याला तिच्या करिअरमधील एका धक्कादायक प्रकरणाबद्दल विचारण्यात आलं. तिने सेलिब्रिटीचं नाव न सांगता एक प्रकरण सांगितलं. तान्याने एका अभिनेत्रीबद्दल खुलासा केला. ही अभिनेत्री बऱ्याच काळपासून इंडस्ट्रीत काम करतेय. ही अभिनेत्री एका नात्यात आहे, पण ते नातं फक्त एक दिखावा आहे. “ही अभिनेत्री बऱ्याच काळापासून या इंडस्ट्रीचा भाग आहे. तिला इंडस्ट्रीत फार काम मिळत नाही, पण तिची प्रतिमा खूप चांगली आहे. ती एका रोमँटिक नात्यात आहे, पण ती फक्त दिखावा करतेय,” असं तान्या पुरी म्हणाली.

अभिनेत्रीचा बॉयफ्रेंड फिल्म इंडस्ट्रीतला नाही

या अभिनेत्रीला लक्झरी आयुष्य जगायीच सवय झाली. पैशांसाठी तिने एस्कॉर्ट म्हणून काम करायला सुरुवात केली. (एस्कॉर्ट म्हणून काम करणं म्हणजे एखाद्या व्यक्तीची जोडीदार म्हणून सार्वजनिक ठिकाणी वावरणं, कार्यक्रमात सोबत जाणं, शारीरिक संबंध ठेवणं. या सर्व कामांचे संबंधित व्यक्ती अभिनेत्रीला पैसे देते.) “ही अभिनेत्री एस्कॉर्ट म्हणून काम करते. ती लोकांबरोबर कार्यक्रमांना जाते आणि त्यासाठी पैसे आकारते. एकदा तिचा बॉयफ्रेंड आमच्याकडे आला आणि म्हणाला, ‘मला वाटतं की ती माझी फसवणूक करत आहे.’ जेव्हा आम्ही तिच्यावर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली तेव्हा आम्हाला लक्षात आलं की तिचे अनेकांशी संबंध आहे. तिचा बॉयफ्रेंड या इंडस्ट्रीतला नाही. ती देशभर बऱ्याच लोकांबरोबर फिरते आणि दिखावा करते, कारण तिला अशा प्रकारची लक्झरी लाइफस्टाइल आवडते,” असं तान्या पुरी म्हणाली.

बॉयफ्रेंडने सगळं समजल्यावरही नातं तोडलं नाही

असे काम करताना क्लायंटबरोबर प्रत्यक्ष करार केले जातात. सगळ्या गोष्टी अधिकृत पद्धतीने केल्या जातात. “ती अभिनेत्री तिच्या क्लायंटबरोबर शारीरिक संबंधही ठेवते. यासाठी ती पैसे आकारते. अभिनेत्रीची टीम समोरच्या व्यक्तीबरोबर करार करते, त्यात फक्त डिनरला जाणं किंवा गप्पा मारणं असाच उल्लेख असतो, पण प्रत्यक्षात ते तेवढ्यापुरतं मर्यादित नसतं. ती शरीरसुख देते आणि त्यासाठी पैसे घेते. ही अभिनेत्री काय करते, हे कळल्यानंतरही तिच्या बॉयफ्रेंडला तिच्याबरोबरचं नातं संपवायचं नव्हतं. त्याला तिला सांगायचं होतं की ती जे करते ते त्याला माहित आहे. पण त्याने नातं संपवलं नाही. कारण तिच्याकडे या कामातून पैसा येतोय. या पैशांचा वापर करून दोघेही चांगले आयुष्य जगतात आणि एकत्र बिझनेस करतात,” असं तान्याने अभिनेत्रीबद्दल सांगितलं.

“ही अभिनेत्री महिन्यातून किमान १० जणांबरोबर फिरते. क्लायंटबरोबर एक रात्री किंवा काही तास घालवते. त्यासाठी ती ५ लाख ते २० लाखांदरम्यान पैसे घेते. २० लाख देणाऱ्याबरोबर ती जास्त वेळ असते,” असं तान्या पुरी म्हणाली. अशी प्रकरणं खूप हाय प्रोफाईल असतात. या प्रकरणांबद्दल खूप गोपनियता बाळगावी लागते. सगळ्याच प्रकरणांमध्ये गोपनियता बाळगावी लागते, पण अशा हाय प्रोफाईल प्रकरणातली कोणतीच माहिती लीक झालेली चालत नाही, असं तान्या पुरीने नमूद केलं.