Bollywood Actress Waiting For Work : गेल्यावर्षी म्हणजेच २०२४ या वर्षांत सर्वात गाजलेली सीरिज म्हणजे संजय लीला भन्साळी यांची ‘हिरामंडी’ ही सीरिज. या सीरिजमध्ये मनीषा कोईराला, सोनाक्षी सिन्हा, आदिती राव हैदरी, रिचा चढ्ढा, फरदीन खान, शेखर सुमन, शर्मीन सहगल, आणि संजीदा शेख यांच्यासह अनेक कलाकारांनी आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. अनेकांनी या सीरिजचं तसंच सीरिजमधील कलाकारांचं भरभरून कौतुक केलं.

या सीरिजला इतका चांगला प्रतिसाद मिळूनही एका अभिनेत्रीने तिला या सीरिजनंतर काम मिळालं नसल्याचं म्हटलं आहे, ही अभिनेत्री म्हणजे अदिती राव हैदरी. अदिती राव हैदरी २०२४ या वर्षात सर्वाधिक चर्चेत असलेल्या सेलिब्रिटींपैकी एक होती. यामागे दोन कारणे होती; एक म्हणजे तिचं अभिनेता सिद्धार्थबरोबर झालेलं लग्न आणि त्याआधी तिची ‘हीरामंडी’मधील भूमिका. या सीरिजची इतकी चर्चा होऊन अदितीला कामाचा काहीच फायदा झाला नाही.

लिली सिंग यांच्याशी झालेल्या सांभाषणादरम्यान ‘हिरामंडी’नंतर अभिनेत्रीला कोणतीही ऑफर आली नसल्याचे तिने सांगितलं आहे. यावेळी ती असं म्हणाली, “या सीरिजच्या इतक्या यशानंतरही मला अद्याप एकही नवीन चित्रपट मिळालेला नाही. ‘हीरामंडी’नंतर मला खूप प्रेम मिळाले, खूप कौतुक झालं. खुप लोकप्रियता मिळाली. पण यानंतर मी माझा पुढचा कोणता चित्रपट साइन केला आहे का? तर नाही. मी अजूनही त्याची वाट पाहत आहे.”

अदिती राव हैदरी इन्स्टाग्राम पोस्ट

संजय लीला भन्साळी निर्मित आणि दिग्दर्शित ‘हीरामंडी: द डायमंड बझार’ मध्ये अदिती राव हैदरीसह मनीषा कोईराला, सोनाक्षी सिन्हा, रिचा चढ्ढा, संजीदा शेख, शर्मीन सेगल आणि ताहा शाह बदुशा यांच्यासह अनेक कलाकार आहेत. गेल्या वर्षी १ मे २०२४ रोजी नेटफ्लिक्स या ओटीटी माध्यमावर ही सीरिज प्रदर्शित झाली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अदिती राव हैदरीच्या ‘कान्स’मधील लूकची झालेली चर्चा

अदिती राव हैदरी सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रीय असते. सोशल मीडियावर ती तिचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असते. काही दिवसांपुर्वी ती कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाली होती. यावेळी तिने लाल साडी आणि भांगेत कुंकू असा पारंपरिक लूक केला होता. या खास लूकमध्ये तिने समुद्रकिनारी फोटोशूट केलं होतं. या फोटोंची बरीच चर्चा झाली होती.