जगातील सर्वात प्रतिष्ठित फॅशन इव्हेंट ‘मेट गाला २०२३’ मध्ये यंदा बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्टने पदार्पण केले. मेट गालामधील आलियाचा संपूर्ण ड्रेस मोत्यांनी डिझाइन करण्यात आला होता. फॅशन डिझायनर ‘प्रबल गुरुंग’ने हा ड्रेस डिझाइन केला होता. दरम्यान, आता आलियाने तिचा ‘मेट गाला २०२३’ मध्ये पदार्पण करण्याचा अनुभव कसा होता, याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा : “आता आम्ही लग्नाची…” परिणिती-राघवचा साखरपुडा पार पडल्यानंतर प्रियांका चोप्राची पोस्ट चर्चेत

आलियाने ‘न्यूज १८’ शी संवाद साधताना सांगितले की, “एवढ्या मोठ्या इव्हेंटमध्ये पदार्पण करण्याआधी माझ्यावर खूप दडपण होते. अगदी रॅम्पवर चालतानाही खूप दबाव असल्याने ‘मी रेड कार्पेटवर पडणार तर नाही’ याची विशेष काळजी घेत होते. पडू नये, या भीतीने मी फक्त माझा ड्रेस आणि हिल्सकडे लक्ष देत, चालताना तोल सांभाळत होते.” जगातील सर्वात प्रतिष्ठित इव्हेंटमध्ये सर्वांसमोर फजिती होऊ नये म्हणून प्रचंड मेहनत घेतल्याचेही तिने सांगितले.

हेही वाचा : थेट दूरचित्रवाहिनीवर.., ‘ऑटोग्राफ’ प्रदर्शनाचा एक वेगळा प्रयोग

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आलिया पुढे म्हणाली, “‘मेट गाला २०२३’ला हजेरी लावणे ही माझ्यासाठी खूप मोठी संधी होती. त्यामुळे मनातून मी आनंदी होते, परंतु या प्रचंड उत्साहासह दडपणसुद्धा आले होते. इतका जड ड्रेस घालून सर्वांसमोर, कॅमेऱ्यासमोर पोज द्यायची आणि याचे चेहऱ्यावर कोणतेही दडपण न दाखवता ‘परफेक्ट’ दिसायचे, ही खूप मोठी जबाबदारी असते. तेथील प्रत्येक क्षणाचा आनंद घेत शोचा गोड शेवट करीन, हा माझा प्रयत्न होता.” ‘मेट गाला २०२३’ मध्ये आलियाने मेड इन इंडिया ड्रेस परिधान केला होता.

आलिया भट्ट लवकरच ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’मध्ये दिसणार आहे. करण जोहर दिग्दर्शित या चित्रपटात रणवीर सिंग, जया बच्चन, धर्मेंद्र आणि शबाना आझमी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा चित्रपट २८ जुलै २०२३ रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होईल.