बऱ्याच काळानंतर ‘वाँटेड’ फेम अभिनेत्री आयशा टाकिया काही दिवसांपूर्वी मुंबई विमानतळावर दिसली होती. यादरम्यानचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. पण आयशाच्या लूकवरून लोकांनी तिला ट्रोल केलं. “प्लास्टिक सर्जरी करून हिने स्वतःचा चेहरा बिघडवला’, अशा आशयाच्या अनेक प्रतिक्रिया लोकांनी तिच्या व्हिडीओवर दिल्या होत्या. एवढंच नाहीतर लोकांनी तिला शरीर रचनेवरून ट्रोल केलं होतं. मात्र आता ट्रोलर्सला आयशाने चांगलंच उत्तर दिलं आहे.

अभिनेत्री आयशा टाकियाने ट्रोल झाल्यानंतर सोशल मीडियावर भलीमोठी पोस्ट लिहिली आहे. आयशा म्हणाली, “मला हे सांगण्याची गरज आहे. दोन दिवसांपूर्वी माझ्या कुटुंबात मेडिकल इमरजेंसी असल्यामुळे गोव्याला निघाले होते. माझी बहीण हॉस्पिटलमध्ये आहे. यादरम्यान मला विमानतळावर काही पापाराझींना थांबवलं. त्यामुळे काही वेळात मी पापाराझींसाठी पोझ दिल्या. पण आपल्या देशात माझ्या लूकवर बोलण्याशिवाय इतर कोणतेही महत्त्वाचे मुद्दे नाहीत, असं मला वाटतं. अनेक जण बेताल मतं मांडत आहेत. मला कसं दिसायला पाहिजे होतं आणि कसं नाही याविषयी बोललं जात आहे. पण मला कुठलाही चित्रपट करण्यात किंवा पुन्हा कमबॅक करण्यात अजिबात रस नाही. मी माझं आयुष्य खूप आनंदात जगत आहे आणि मला चर्चेत राहण्याची इच्छा नाहीये. मी कुठल्याही चित्रपटात काम करू इच्छित नाही. त्यामुळे कृपया माझी काळजी करू नका.”

हेही वाचा – Video: राजकारणानंतर ‘या’ मराठी अभिनेत्रीची व्यवसायात उडी, रत्नागिरीच्या समुद्र किनारी सुरू केला सुंदर व्हिला

“एखाद्या मुलीला पौगंडावस्थात असताना पाहिलं तर ती १५ वर्षांनंतर तशीच हुबेहुब दिसेल, अशी अपेक्षा केली जाते. पण असे लोक हास्यास्पद असतात. सुंदर दिसणाऱ्या महिलांवर स्वतःचं मत मांडण्यापेक्षा आपल्या वेळेचा सदुपयोग करा. मला खूप छान आयुष्य लाभलं आहे आणि तुमच्या कुठल्याही मतांची किंवा सल्ल्यांची गरज नाहीये. मी तुमची नकारात्मक उर्जा परत तुम्हाचा पाठवत आहे. चांगले व्हा, छंद जोपासा, चांगलं खा, आपल्या मित्रांशी बोला, हसत राहा. असं काहीतरी करा, ज्यामुळे तुम्हाला एका आनंदी आणि सुंदर महिलेकडून सांगण्याची गरज भासणार नाही की, जसं तुम्हाला पाहिजे तशी ती दिसत नाहीये,” असं म्हणत आयशाने ट्रोलर्सना चांगलंच सुनावलं.

हेही वाचा – Video: “गेले काही दिवस गोकुळधाममधल्या…”, साखरपुड्यात पूजा सावंत व सिद्धेश चव्हाणचं अनोख्या अंदाजात ‘या’ व्यक्तीने केलं स्वागत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, आयशाने २००४ साली ‘टार्जन द वंडर कार’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर आयशा ‘डोर’, ‘नो स्मोकिंग’, ‘वाँटेड’ या चित्रपटांमध्ये ती झळकली. नागेश कुकुनूरच्या ‘मोड’ चित्रपटात अभिनेत्री शेवटची पाहायला मिळाली.