सध्या बॉलिवूडमध्ये घरोघरी सनई चौघडे ऐकू येत आहेत किंवा नवीन पाहुण्याच्या स्वागतासाठी लगबग सुरू आहे. नुकतंच ‘बिग बॉस ७’ची विजेती आणि बॉलिवूड अभिनेत्री गौहर खानने एक गोड बातमी देत चाहत्यांना सरप्राइज दिलं आहे. गौहर खान आणि झैद यांच्या लग्नानंतर लगेच ३ महिन्यात गौहार गरोदर असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. यावर अभिनेत्री चांगलीच भडकली होती.

येत्या २५ डिसेंबरला गौहर आणि झैद यांनी त्यांच्या लग्नाचा दूसरा वाढदिवस साजरा करतील. त्याआधीच खुद्द गौहरने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही बातमी दिली आहे. अतिशय वेगळ्या आणि मजेशीर पद्धतीने ही बातमी चाहत्यांना दिली आहे. एक कार्टूनचा व्हिडिओ शेअर करत ‘गौहर झैद आणि +१’ असं सांगत तिने ही पोस्ट शेअर केली आहे.

आणखी वाचा : ५० श्रेष्ठ अभिनेत्यांच्या यादीत किंग खानचा समावेश; हा सन्मान मिळवणारा शाहरुख ठरला एकमेव भारतीय

याबरोबरच “या सुखद प्रवासात तुमच्या आशीर्वादाची गरज आहे” असं लिहीत गौहरने चाहत्यांना सरप्राइज दिलं. २५ डिसेंबर २०२० मध्ये गौहर खान आणि झैद दरबार विवाहबंधनात अडकले. यानंतर या दोघांनी सोशल मीडियावर त्यांच्या बऱ्याच आठवणी शेअर केल्या. त्यांच्या लग्नाचे फोटो चांगलेच व्हायरल झाले होते. आता या गोड बातमीमुळे गौहरच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गौहर बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने अनेक चित्रपट आणि सीरिजमध्ये काम केलं आहे. ती तिच्या खासगी आणि व्यावसायिक आयुष्यासाठी नेहमीच चर्चेत असते. गौहर खान नुकतीच नेटफ्लिक्सवर ‘१४ फेरे की कहानी’ या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारली होती. आता गौहरच्या बेबी बंपचे आणि छोट्या बाळाचे फोटो पाहण्यासाठी तिचे चाहते उत्सुक आहेत.