दिवंगत अभिनेत्री श्रीदेव आणि बोनी कपूर यांची लाडकी लेक जान्हवी कपूर नेहमी चर्चेत असते. ‘धडक’ या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलेली जान्हवी सध्या आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. ‘धडक’नंतर तिने अनेक चित्रपटात काम करून आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलीवूडमध्ये स्वतंत्र स्थान निर्माण केलं आहे.

सध्या जान्हवीच्या एका नव्या लूकने चाहत्यांना घायाळ केलं आहे. रॉयल ब्ल्यू रंगाच्या साडीत तिचं सौंदर्य खुललेलं पाहायला मिळत आहे. जान्हवीच्या या साडीतील फोटो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले आहेत. पण तुम्हाला जान्हवीच्या या साडीची किंमत माहितेय का?

हेही वाचा – १०३ ताप, लाल डोळे घेऊन त्रिशा ठोसरने दिली होती ‘नाळ २’साठी ऑडिशन; आईने सांगितला ‘तो’ किस्सा

गेल्या काही दिवसांपासून बॉलीवूड विश्वात दिवाळी पार्टीज सुरू आहेत. अनेक कलाकार दिवाळी पार्टीचे आयोजन करत आहेत. या पार्टीसाठी बॉलीवूड सेलिब्रिटींनी केलेले वेगवेगळे लूक सध्या चर्चेचा विषय आहेत. यामध्ये अभिनेत्री जान्हवी कपूरने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतलं आहे. कधी पारंपारिक तर कधी मॉर्डन लूकमध्ये ती पाहायला मिळत आहेत.

जान्हवीचा सध्या रॉयल ब्ल्यू रंगाचा डीपनेक स्लीवलेस ब्लाउजसह साडीतला लूक चांगलाच चर्चेत आला आहे. याचे फोटो तिने स्वतः सोशल मीडियावर शेअर केले आहेत. जान्हवीने हे फोटो शेअर करत लिहीलं आहे, “या लूकसाठी मी खूप उत्सुक आहे, कारण मी माझा मेकअप स्वतः केला आहे.”

हेही वाचा – “आता खूप बदललास…” एल्विश यादवने सलमान खानचा फोटो शेअर करून केलेली ‘ती’ पोस्ट चर्चेत

पण जान्हवीच्या या रॉयल ब्ल्यू रंगाच्या साडीची किंमत वाचून थक्क करणारी आहे. ४० किंवा ५० हजार नाही तर ९५ हजार या साडीची किंमत आहे. प्रसिद्ध डिझायनर अर्पिता मेहताने ही साडी डिझाइन केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा – Video: ईशा केसकरच्या ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिकेचं दमदार शीर्षकगीत प्रदर्शित, पाहा व्हिडीओ

दरम्यान, जान्हवीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, तिचा काही महिन्यांपूर्वी ‘बवाल’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. ओटीटी प्लॅटफॉर्म प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात ती वरुण धवनबरोबर झळकली होती.