शाहरुख-काजोलचा एव्हरग्रीन चित्रपट ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ ज्याची चर्चा आजही होते. देशभरातच नव्हे तर जगभरात या चित्रपटाचे चाहते आहेत. लंडनमध्ये वाढलेले हिरो हेरॉईन, यूरोपमध्ये झालेली भेट, मायदेशात लग्न अशी भट्टी या चित्रपटाची होती. अशा पुरेपूर मसाला असलेल्या चित्रपटाचा रिमेक करण्याची इच्छा अनेकांना आहे. यावरच आता अभिनेत्री काजोलने भाष्य केलं आहे.

अभिनेत्री काजोलने आपल्या करियरमध्ये कायमच वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट केले आहेत. मात्र दिलवाले हा चित्रपट तिच्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट होता. न्युज १८ शी बोलताना असं म्हणाले, “माझे वैयक्तिक मत असे आहे की “दिलवाले दुल्हानिया ले जायेंगेसारखे चित्रपट पुन्हा बनवले नाहीत पाहिजेत. ‘कभी खुशी कभी गम’ या चित्रपटाच्याबाबतीत हेच आहे. मला असे वाटते की ती जादू एकदाच एकदाच तयार केली जाऊ शकते. जर आपण ते पुन्हा तयार केले तर ते तयार होईल मात्र आधीसारखी त्यात भावना नसणार.”

सौरव गांगुली नव्हे तर ‘या’ दिग्गज गायकाच्या बायोपिकमध्ये झळकणार रणबीर कपूर; अभिनेत्याने केला खुलासा

पुढे अभिनेत्री म्हणाली, “तुम्ही कितीही मेहनतीने चित्रपट बनवलात तरीही तुमच्या पदरी निराशा पडणार आहे. ती जादू चित्रपटात यायला हवी. तुम्ही चित्रपट पाहत असताना तुम्हाला कळेल की आधीच्या चित्रपटाप्रमाणे यात भावना नाहीत.” अशी प्रतिक्रिया तिने दिली आहे.

View this post on Instagram

A post shared by Kajol Devgan (@kajol)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

१९९५ साली प्रदर्शित झालेल्या शाहरुख खान आणि काजोलच्या लव्हस्टोरीला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं. या चित्रपटानंतर शाहरुख आणि काजोलच्या करीअरला एक वेगळंच वळण मिळालं. ते तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनले. यशराज फिल्म्सने चित्रपटाची निर्मिती केली आहे. आजही मुंबईच्या मराठा मंदिर या चित्रपटगृहात हा चित्रपट सुरू आहे. लवकरच हा चित्रपट तिथे १०००० दिवस पूर्ण करणार आहे.