बॉलिवूडची ‘बेबो’ अर्थात करीना कपूर खान काही ना काही कारणाने चर्चेत असते. बॉलिवूडमध्ये तिला ‘गॉसिप क्वीन’ म्हणून ओळखलं जातं. करीना सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. करीना नुकतीच आमिर खानबरोबर चित्रपटात झळकली. चित्रपट जरी चालला नसला तरी तिच्या भूमिकेची लोकांनी प्रशंसा केली. आता बेबो पुन्हा चर्चेत आहे ती तिच्या फिटनेसमुळे.

मूलं झाल्यानंतर बऱ्याचदा करीना कॅमेरासमोर आली. तेव्हा तिच्या शरीरात झालेल्या बदलामुळे तिला बऱ्याच लोकांनी ट्रोल केलं. या ट्रोलिंगकडे करीनाने फारसं लक्ष न देता स्वतःच्या फिटनेसकडे तिने लक्ष दिलं. अवघ्या काही दिवसात करीनाने योगा आणि वर्कआऊटच्या माध्यमातून लोकांना चोख उत्तर दिलं.

आणखी वाचा : “हा शाहरुख खानचा चित्रपट आहे म्हणून…” संजय राऊतांचं ‘पठाण’मधील गाण्याच्या वादावर मोठं वक्तव्य

आत्तासुद्धा करीनाच्या या फिटनेसचा एक व्हिडिओ चर्चेत आहे. या व्हिडिओमध्ये करीना योगा आणि इतर वर्कआउट करताना दिसत आहे. तिच्या शरीरवर ती मेहनत घेत असल्याचं यातून स्पष्ट होत आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. करीना यात योगासनं आणि धावणं पळणं तसेच वेगळ्या प्रकारचा व्यायाम करताना दिसत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

करीनाच्या या व्हीडीओखाली बऱ्याच लोकांनी तिच्या या मेहनतीला दाद दिली आहे तर बऱ्याच लोकांनी ती वापरत असलेल्या योगा मॅटबद्दल टिप्पणी केली आहे. करीना ज्या मॅटवर योगा करत आहे ती मॅट फारच मळलेली आहे. यावरून तिच्या चाहत्यांनी तिला चांगलंच ट्रोल केलं आहे. योगा मॅट बदला किंवा नीट धुवा तरी अशी कॉमेंट करत लोकांनी तिला ट्रोल केलं आहे. करीना लवकरच हंसल मेहता यांच्या चित्रपटात झळकणार आहे.