धकधक गर्ल माधुरी दीक्षित आणि तिचे पती श्रीराम नेने यांची निर्मिती असलेला ‘पंचक’ हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर माधुरी दीक्षितने या चित्रपटाची घोषणा केली होती. काल या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित झाला. त्यामुळे सध्या माधुरी दीक्षितच्या ‘पंचक’ चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगली आहे. नुकतेच माधुरी आणि तिचे पती श्रीराम नेने ‘सकाळ’च्या स्वास्थ्यम या कार्यक्रमात सहभागी झाले होते. तेव्हा दोघांनी स्वास्थापासून ते त्यांच्या लव्हस्टोरीपर्यंतचे अनेक किस्से सांगितले.

या कार्यक्रमात माधुरी दीक्षितला विचारण्यात आलं की, करिअरच्या शिखरावर असताना श्रीराम नेनेंशी लग्न करून अमेरिकेत स्थायिक होण्याचा निर्णय का घेतला? यावर माधुरी म्हणाली, “मी जेव्हा रामला भेटले तेव्हा मला असं वाटलं ही व्यक्ती माझ्यासाठीच आहे. मग मी माझं करिअर आहे, हे आहे, ते आहे असा विचार केला नाही. मी नेहमी माझ्या मनाच ऐकते. मला वाटलं की, यालाच माझ्यासाठी बनवलं आहे. ‘दिल तो पागल है’ चित्रपटातला एक डायलॉग आहे, जो अगदी अचूक आहे. ‘कहीं ना कहीं, कोई ना कोई मेरे लिए बना दिया गया है. कभी ना कभी मैं उसे जरूर मिलूंगी.’ त्याप्रमाणे मी याला एलएमध्ये भेटले.”

हेही वाचा – बॉलीवूडचा प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक अडकला लग्नबंधनात; सलमान खानने लावली हजेरी, व्हिडीओ झाला व्हायरल

“याने जास्त हिंदी चित्रपट पाहिले नव्हते. त्यामुळे त्याला माझी पार्श्वभूमी जास्त माहित नव्हती. जशा दोन व्यक्ती एकमेकांना भेटतात त्याप्रमाणेच आम्ही भेटलो. त्याच्या मनात काही नव्हतं. दीदी तेरा देवर दिवाना असं करत तो येणार नव्हता. आम्ही जेव्हा भेटलो तेव्हा आमच्यात खूप छान संवाद झाला. त्यामुळे आमची खूप चांगली केमस्ट्री बनली. तेव्हाच मी निर्णय घेतला की, ही व्यक्ती माझ्यासाठी आहे आणि मी माझं स्वप्न जगू लागले. आपण जेव्हा एखादं स्वप्न पूर्ण करण्याचा विचार करतो तेव्हा कुटुंब हा सुद्धा त्यामधला एक भाग असतो. मला देखील मुलं पाहिजे होती, एक मोठं कुटुंब पाहिजे होतं. कारण मी देखील मोठ्या कुटुंबात वाढली आहे. आम्ही चार भावंडं आहोत. म्हणून त्यावेळी मी फक्त माझं स्वप्न जगले. त्यात माझं काहीही चुकलं नाही. मी माझं स्वप्न जगून पुन्हा परतले,” असं माधुरी दीक्षित म्हणाल्या.

हेही वाचा – “अत्यंत हीन दर्जाच्या…”, बॉडी शेमिंग करणाऱ्यांना केतकी माटेगावकरने दिलं सडेतोड उत्तर, म्हणाली, “तुम्हाला सुद्धा घरात बहिणी, आई…”

View this post on Instagram

A post shared by Dr. Shriram Nene (@drneneofficial)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, माधुरी दीक्षितचा ‘पंचक’ हा मराठी चित्रपट ५ जानेवारी २०२४ प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात आदिनाथ कोठारेसह दिलीप प्रभावळकर, आनंद इंगळे, तेजश्री प्रधान, सतीश आळेकर, नंदिता पाटकर, दीप्ती देवी अशा तगड्या कलाकार मंडळींची मांदियाळी आहे.