पॅलेस्टिनी कट्टरवादी गट ‘हमास’ने इस्रायलवर हल्ला केल्यामुळे संपूर्ण जग हादरलं आहे. शनिवारी अचानक ‘हमास’ने इस्रायलवर एकाच वेळी पाच हजार रॉकेट सोडून मोठा हल्ला केला. त्यानंतर इस्रायलने देखील गाझा पट्टीवर प्रत्युत्तरादाखल अनेक हवाई हल्ले केले. यामध्ये मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली आहे. इस्रायल आणि हमासमध्ये सुरू असलेल्या संघर्षाने आता गंभीर रुप धारण केलं आहे. अशी भयावह परिस्थिती असताना बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री नुसरत भरुचा इस्रायलमध्ये अडकली होती. पण आता ती सुखरुप मायदेशी परतली आहे. या संबंधीत व्हिडीओ समोर आला आहे.

हेही वाचा – “हमास दहशतवाद्यांकडून बलात्काराचा शस्त्रासारखा वापर”, अनेक महिला बेपत्ता झाल्यानंतर ‘इस्रायल वॉर रुम’कडून भीती व्यक्त

अभिनेत्री नुसरत भरुचा ही हैफा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी इस्रायलला गेली होती. पण शनिवारी अचानक झालेल्या इस्रायलवरील हल्ल्यामुळे ती तिथेच अडकली. तिच्या टीमने शनिवारी दुपारी १२.३०ला तिच्याशी शेवटचा संपर्क केला होता. तेव्हा ती बेसमेंटमध्ये सुरक्षित होती. पण तेव्हापासून नुसरतशी संपर्क होत नव्हता. तिच्याशी संपर्क साधण्यासाठी आणि तिला सुरक्षित भारतात परत आणण्यासाठी तिच्या टीमकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात होते. अखेर ती सुखरुप भारतात परतली आहे.

हेही वाचा – ‘हमास’च्या इस्रायलवरील हल्ल्यामागचे कारण काय? आखातात मोठ्या युद्धाचा भडका उडणार?…

‘फिल्मी ग्यान’ या एंटरटेन्मेंट मीडियाच्या इन्स्टाग्रामवर पेजवर मुंबई विमानतळावरील नुसरतचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये नुसरत सुखरुप परतल्याचे दिसत असून ती यावेळी भावुक झाल्याचं पाहायला मिळत आहे. “मला थोडा वेळ द्या,” असं मीडियाला सांगताना नुसरत दिसत आहे.

View this post on Instagram

A post shared by F I L M Y G Y A N (@filmygyan)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, नुसरत इस्रायलमध्ये अडकल्याचे वृत्त सर्वत्र पसरताच तिच्या आईने ती सुखरुप असल्याची माहिती दिली. “माझी मुलगी सुरक्षितपणे भारतात परतत आहे. आम्ही खूप आनंदी आहोत,” असं नुसरतची आई तस्नीम भरुचा म्हणाल्या होत्या.