‘हमास’ या इस्लामी कट्टरवादी गटाने शनिवारी अचानक इस्रायलवर हल्ला केला. यामुळे संपूर्ण जग हादरलं आहे. हमासच्या हल्ल्यानंतर इस्रायलने देखील गाझामध्ये अनेक हवाई हल्ले केले. यामध्ये मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली आहे. इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामीन नेतान्याहू यांनी ‘हमास’ विरोधात युद्धाची घोषणा केली असून शत्रूला मोठी किंमत मोजावी लागेल, असा इशारा दिला आहे. अशा या युद्धजन्य परिस्थिती असलेल्या इस्रायलमध्ये बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री अडकल्याचं समोर आलं आहे.

हेही वाचा – हमासकडून इस्रायलवर ५ हजार रॉकेट्सचा हल्ला, अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांची प्रतिक्रिया, म्हणाले…

अभिनेत्री नुसरत भरुचा इस्रायलमध्ये अडकली आहे. याबाबत तिच्या टीममधील एका सदस्याने माहिती दिली. ती व्यक्ती म्हणाली की, दुर्दैवाने नुसरत इस्रायलमध्ये अडकली आहे. ती तिथे हैफा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी गेली होती.

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, नुसरतच्या टीमने तिच्याशी शेवटचा संपर्क शनिवारी, दुपारी १२.३० केला होता. तेव्हा ती बेसमेंटमध्ये सुरक्षित होती. पण तेव्हापासून नुसरतशी पुन्हा संपर्क होत नाहीये. तिच्याशी संपर्क साधण्यासाठी आणि तिला सुरक्षित भारतात परत आणण्यासाठी टीमकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत.

हेही वाचा – अविनाश नारकरांना नेटकरी म्हणाला ‘आजोबा’, ऐश्वर्या नारकरांनी दिलं जबरदस्त उत्तर; म्हणाल्या…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, हमासने केलेल्या या हल्ल्यात इस्रायलमध्ये किमान १०० लोकांचा मृत्यू झाला आहे. तर ७४० हून अधिक लोक जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. दुसरीकडे, इस्रायलकडून केलेल्या हवाई हल्ल्यात गाझामध्ये १९८ जणांचा मृत्यू झाला, तर १६०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत.