नुकतंच बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राने बॉलिवूडमधील वर्णभेदावर भाष्य केलं तसंच तिने चित्रपट क्षेत्रातील कार्यपद्धतीवरही भाष्य केलं आहे. प्रियांकानंतर आता सैयामी खेर हिनेदेखील बॉलिवूडमधील बॉडी शेमिंगवर वक्तव्य केलं आहे. या क्षेत्रात पदार्पण केल्यावर तिच्या रंग-रुपावरून तिला बऱ्याचदा हिणवलं गेल्याचं तिने स्पष्ट केलं आहे. सैयामीने कुणाचं नाव घेतलेलं नाही पण एकूणच तिच्या या अनुभवाबद्दल सांगितलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२०१५ च्या तेलुगू चित्रपट ‘रे’मधून सैयामीने पदार्पण केलं होतं. त्यानंतर तिने राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्या ‘Mirzya’ या चित्रपटातून हिंदीमध्ये काम करायला सुरुवात केली. ‘हिंदुस्तान टाईम्स’च्या वृत्तानुसार बॉलिवूडमध्ये होणाऱ्या बॉडी शेमिंगबद्दल बोलताना सैयामी म्हणाली की, “लोक तुमच्याबद्दल एखादं मत बनवून घेतात आणि तुमच्याबद्दल वाईट साईट बोलतात. जेव्हा मी या क्षेत्रात पदार्पण करणार होते तेव्हा कित्येकांनी मला नाकाची, ओठांची सर्जरी करायचा सल्ला दिला होता. मी जशी आहे तशी खुश आहे. त्यामुळे मी या गोष्टी जास्त मनावर घेतल्या नाहीत, पण ही गोष्ट खूप वाईट आहे.”

आणखी वाचा : “मी शाहरुख खानला friendzone…” श्रिया पिळगांवकरने सांगितली तिच्या पहिल्या हिंदी चित्रपटाची आठवण

इतकंच नाही तर या मुलाखतीमध्ये तिने लोकांना सल्लासुद्धा दिला आहे. सैयामी म्हणाली, “आपल्या आजूबाजूला बरीच संवेदनशील माणसं असतात. आपण कळतनकळत त्यांना दुखवू शकतो. त्यामुळे आपण काय बोलतोय याकडे आपण लक्ष ठेवलं पाहिजे नाहीतर नकारात्मकता मनात घर करते.”

मध्यंतरी सैयामी अनुराग कश्यपच्या ‘चोक्ड’ या चित्रपटात झळकली होती. त्यानंतर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या अभिषेक बच्चनच्या ‘ब्रीद : इनटू द शॅडो’ या वेबसीरिजमध्येसुद्धा तिने महत्त्वाची भूमिका केली होती. या दोन्ही वेबसीरिजमधील तिच्या कामाची प्रेक्षकांनी प्रशंसा केली. सैयामी लवकरच अश्विनी अय्यर यांच्या आगामी वेबसीरिजमध्ये मुख्य भूमिकेत झळकणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bollywood actress saiyami kher share her experience of body shaming in film industry avn
First published on: 08-12-2022 at 17:01 IST