बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीची बहीण शमिता शेट्टी नेहमी चर्चेत असते. बॉलीवूडपासून दूर असली तरी सोशल मीडियावरील तिच्या पोस्ट कायम चर्चेत असतात. नुकताच अभिनेत्रीने एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामधून शमिताने तिला ‘प्री-मेनोपॉज’चा त्रास सुरू झाल्याचं सांगितलं आहे. याबाबत अधिक जागरूकता निर्माण करणे गरज आहे, असं शमिता म्हणाली आहे.

“तुमची गोष्ट प्रतिक्रियेद्वारे सांगा,” असं कॅप्शन लिहित अभिनेत्री शमिता शेट्टीने काही तासांपूर्वी व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती ‘प्री-मेनोपॉज’मुळे नक्की काय होतं? कोणती लक्षणे जाणवतात? शिवाय ही स्थिती महिलांसाठी किती त्रासदायक आहे? याविषयी बोलली आहे. व्हिडीओत अभिनेत्री म्हणाली, “माझी भूक वाढली आहे, सतत मूड बदलतो, अस्पष्ट दिसत, हृदयाचे ठोके वाढतात, हा एक वेडेपणा आहे. इतकी लक्षणे बघून मला असं वाटलं की, मी या स्थितीत एकटीच आहे. पण जेव्हा मी माझ्याच वयाच्या म्हणजे चाळीशीमधल्या मैत्रिणींबरोबर बोलले, तेव्हा त्यांनी मला तिच लक्षणे सांगितली. विशेष म्हणजे अस्पष्ट दिसणे, वजन वाढणे आणि भूक लागणे. मग मी याचा अजून शोध घ्यायला सुरुवात केली आणि मला एक लेख वाचायला मिळाला, ज्यामध्ये प्री-मेनोपॉजबद्दल लिहीलं होतं.”

हेही वाचा – ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्री सोनाली पाटीलने तृतीयपंथींना भेटल्यानंतरचा अनुभव केला शेअर, म्हणाली, “श्रीकृष्णा तू…”

“मला प्री-मेनोपॉज म्हणजे काय हे माहित नव्हतं. मला वाटलं होतं की, एका विशिष्ट वयानंतर आपण या स्थितीतून जात असू. पण तुम्हाला माहितेय का? तुम्ही १० वर्षांपूर्वीही प्री-मेनोपॉजच्या स्थितीतून जाऊ शकता? महिलांसाठी हा काळ खूप कठीण आहे. तसेच या स्थितीला सामोर जाण्यासाठी पीएमएस पाहावं लागत. आपणच जन्म देतो, आपणच आपल्या हार्मोनल बदलांमधून जातो आणि आता या यादीत प्री-मेनोपॉज सामील झाला आहे.”

हेही वाचा – शाहरुख खानच्या आगामी चित्रपटाचं नाव ‘डंकी’ का ठेवलं? अभिनेत्यानं स्वतः सांगितलं कारण, म्हणाला…

पुढे शमिता म्हणाली, “याबाबत जागरूकता निर्माण करणं महत्त्वाच आहे. अनेक महिलांना या स्थितीबाबत माहित नसेल याची मला खात्री आहे, कारण मलाही याबाबत माहित नव्हतं. आपण याबद्दल अधिक बोललं पाहिजे. हार्मोनल बदल होत आहेत, त्यामुळे महिलांना हे सर्व काही होत असतं. मी या स्थितीत एकटीच नाहीये. याबद्दल आपण अधिक बोलणं फार गरजेचं आहे. खिल्ली उडवतं अनेक व्हिडीओ केले जातात. पण तुम्हाला माहित आहे का? महिला किती हार्मोनल बदलातून जाते. हा एक वेडेपणा आहे. महिलांसाठी हे काही सोप नसतं.”

View this post on Instagram

A post shared by SHAMITA SHETTY (@shamitashetty_official)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, शमिताच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, तिने तिच्या करिअरमध्ये फक्त ९ चित्रपट केले आहेत. यामधील शमिताचे बहुतेक चित्रपट फ्लॉप झाले आहेत. पण तिला शरारा या गाण्यामुळे चांगलीच लोकप्रिय मिळाली. तसेच शमिता बिग बॉसमध्ये सहभाग घेतल्यानंतर चांगलीच चर्चेत राहिली.