९० च्या दशकात अभिनयाबरोबर सौंदर्याने प्रेक्षकांना भूरळ घालणारी अभिनेत्री म्हणून शिल्पा शेट्टीला ओळखले जाते. शिल्पा शेट्टी ही बॉलिवूडमध्ये नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असते. ‘बाजीगर’ या चित्रपटातून शिल्पाने आपल्या कलाविश्वातील कारकिर्दीला सुरुवात केली. तिचा चाहतावर्ग दिवसागणिक वाढताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी एका आगामी चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान पाय फ्रॅक्चर झाला होता. या दुर्घटनेनंतर सहा आठवड्यांसाठी डॉक्टरांनी तिला आराम करण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर आता शिल्पा शेट्टी पुन्हा पडता पडता बचावली आहे. तिचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

शिल्पा शेट्टी ही मुंबईत खरेदीसाठी गेली होती. यावेळी एका दुकानात जात असताना तिकडे काही पापाराझी तिला फोटोसाठी विनंती करु लागले. यावेळी शिल्पा शेट्टीने दुकानाचा दरवाजा उघडला. मात्र हा दरवाजा उघडत असताना ती पापाराझींना फोटोसाठी पोज देत होती. यावेळी तिचा तोल गेला. पण ती पडता पडता वाचली. ही सर्व घटना पापाराझींच्या कॅमेऱ्यात कैद झाली.
आणखी वाचा : Exclusive Video : “ते तरी…” केसांवर होणाऱ्या विनोदावर समीर चौगुले स्पष्टच बोलले

इंस्टंट बॉलिवूडने याचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओत शिल्पा शेट्टी ही पापाराझींवर भडकल्याचेही पाहायला मिळत आहे. मी म्हणून सांगत असते… असे शिल्पा शेट्टी ही रागात त्या सर्व फोटोग्राफर्सवर भडकते. तिचा हा व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आला आहे.

आणखी वाचा : “पहिलं आणि शेवटचं…” शिव ठाकरेबद्दलचा प्रश्न विचारल्यानंतर वीणा जगताप संतापली

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान शिल्पा शेट्टी ही उत्तम नृत्यांगणा म्हणून ओळखली जाते. आतापर्यंत अनेक रिअॅलिटी शो चे परीक्षण तिने केले आहे. तसेच तिला फिटनेस फ्रीक अभिनेत्री म्हणूनही ओळखली जाते. ती अनेकदा योगा, जीम करतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.