दिग्गज अभिनेत्री शर्मिला टागोर आणि क्रिकेटपटू मन्सूर अली खान पतौडी यांची मुलगी सोहा अली खान सध्या चर्चेत आहे. बॉलिवूड चित्रपटात क्वचित दिसणारी सोहा ही सध्या सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. आज सोहाने ४४ वर्षात पदार्पण केलं आहे. हिंदी चित्रपटात अयशस्वी ठरल्याने तिने या क्षेत्रापासून फारकत घेतली होती.

शर्मिलाजी आणि टायगर पतौडी यांच्या ३ मुलांपैकी सोहा ही सर्वात धाकटी मुलगी. त्यांचा मोठा मुलगा सैफ अली खान हे चित्रपटसृष्टीतील एक मोठं नाव आहे. सैफ सध्या त्याच्या ‘आदिपुरुष’मधील रावणाच्या भूमिकेमुळे चर्चेत आहे. सोहाने दिल्लीमधील ब्रिटिश विद्यालयात तिचं शालेय शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर तिने ‘लंडन स्कूल ऑफ एकॉनॉमिक्स अँड पोलिटिकल सायन्स’मधून पदवीचं शिक्षण घेतलं.

आणखी वाचा : प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शकाने केली ‘आदिपुरुष’बद्दल भविष्यवाणी; म्हणाले “हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर…”

लंडनच्या ऑक्सफोर्ड विद्यापीठातून उच्च शिक्षण घेताना सोहाला एका बँकेत नोकरीची संधी मिळाली होती. त्या बँकमध्ये तिने नोकरी केली पण त्यासाठी तिला दिल्लीमध्ये प्रशिक्षण देण्यात आलं. सोहाने या बँकेत इन्वेस्टमेंट बँकर म्हणून काम केलं होतं. यानंतर सोहाने तिचा मोर्चा चित्रपटक्षेत्राकडे वळवला.

View this post on Instagram

A post shared by Soha (@sakpataudi)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२००४ मध्ये बंगाली चित्रपट ‘इति श्रीकांता’ मधून सोहाने तिच्या करकीर्दीची सुरुवात केली. बॉलिवूडमध्ये शाहिद कपूरच्या ‘दिल मांगे मोर’ आणि ‘रंग दे बसंती’ या चित्रपटातून सोहाला ओळख मिळाली. यानंतर मात्र सोहाच्या कोणत्याच चित्रपटाने म्हणावी तशी कामगिरी केली नाही. त्यामुळे ती हळूहळू या क्षेत्रापासून दूर केली. नंतर तिने तिचा प्रियकर आणि बॉलिवूड अभिनेता कुणाल खेमूबरोबर लग्न केलं. सोहा अली खान नुकतीच प्राइम व्हिडिओच्या ‘हश हश’ या वेबसीरिजमध्ये झळकली आहे. सोहाबरोबर या सीरिजमध्ये आयेशा झुलका, जुही चावलासारख्या दमदार अभिनेत्रीही महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.