बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करने फेब्रुवारी महिन्यात तिच्या लग्नाबाबत माहिती दिली होती. स्वराने सोशल मीडियावरुन व्हिडीओ शेअर करत समाजवादी पार्टीचा नेता असलेल्या फहाद अहमदबरोबर लग्न केल्याचं सांगितलं होतं. ६ जानेवारीला स्वरा व फहादने कोर्ट मॅरेज केलं होतं. त्यानंतर त्यांनी गुपचूप साखरपुडाही उरकला होता. आता स्वरा भास्कर व फहाद अहमद पारंपरिक पद्धतीने विवाह करणार आहेत.

‘हिंदुस्तान टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, स्वरा व फहाद मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात लग्नबंधनात अडकणार आहेत. ११ ते १६ मार्चदरम्यान स्वरा व फहादच्या मेहेंदी, हळदी व संगीत हे कार्यक्रम पार पडणार आहेत. स्वरा भास्कर दिल्लीतील तिच्या आजोळी लग्नगाठ बांधणार आहे. आजी व आजोबांच्या घरीच स्वराचा लग्नसोहळा पार पडणार आहे. स्वरा व फहादच्या लग्नाची जोरदार तयारी करण्यात येत आहे. कुटुंबीय व मित्रपरिवाराच्या उपस्थितीत स्वरा फहादबरोबर लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. नातेवाईक व मित्रमैत्रिणींना लग्नाचं आमंत्रणही देण्यात आल्याची माहिती आहे.

हेही वाचा>> हृदयविकाराच्या झटक्यानंतर सुश्मिता सेननं पहिल्यांदाच केलं इन्स्टा लाइव्ह, प्रकृतीबाबत माहिती देत म्हणाली “माझ्या घशाला…”

हेही वाचा>> नवाजुद्दीन सिद्दीकीविरोधात तक्रार दाखल करण्यास पोलिसांचा नकार; पत्नी आलियाने एकनाथ शिंदेंना केली विनंती, म्हणाली “मुख्यमंत्री…”

कोर्ट मॅरेज केल्यानंतर स्वराच्या आईने तिला खास सरप्राइज दिलं होतं. स्वरा व फहादच्या मधुचंद्रासाठी तिच्या आईने एकदम फिल्मी पद्धतीने त्यांच्या रुममध्ये सजावट केली होती. चित्रपटात दाखवतात त्याप्रमाणे स्वरा व फहादच्या रुममधील बेडला फुलांचं डेकोरेशन करण्यात आलं होतं. स्वराने सोशल मीडियावर बेडरुमचा फोटो शेअर केला होता.

हेही पाहा>> “नाईट ड्रेस छान आहे” अमृता फडणवीसांना नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले “मेकअपला उशीर झाला म्हणून…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

स्वरा व फहादची पहिली भेट डिसेंबर २०१९ मध्ये एका आंदोलनादरम्यान झाली होती. त्यानंतर त्यांच्यात मैत्री झाली. प्रेमाच्या शोधात असलेल्या स्वरा व फहादला एकमेकांमध्ये चांगले मित्र भेटले. त्यानंतर भेटीगाठी वाढत गेल्या आणि त्यांच्यातील मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.त्यानंतर तीन वर्षांनी त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. फहादशी कोर्ट मॅरेज केल्यानंतर स्वराने नवीन आयुष्याची सुरुवात केली आहे.