दाक्षिणात्य चित्रपटानंतर आता बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे तापसी पन्नू. तापसी पन्नू सध्याची आघाडीची अभिनेत्री आहे.तापसी पन्नू मुक्तपणे कोणत्याही मुद्द्यावर भाष्य करत असते. माध्यमांसमोर केलेल्या वक्तव्यांमुळे ती अनेकदा अडचणीत सापडली आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये तिचा ‘दोबारा’ हा सस्पेन्स थ्रिलरपट प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला.

तापसीने नुकतीच बॉलिवूडच्या दिवाळी पार्टीला हजेरी लावली होती. या निमित्ताने तिने पुन्हा एकदा पत्रकारांशी संवाद साधला आहे. मात्र यावेळी तिने पत्रकारांना सांगितले की आज ओरडू नका, तुम्ही जर असे वागलात तर मी तुमच्यावर नाही ओरडणार. असं तिने पत्रकारांना सांगितले. मध्यंतरी एका पुरस्कार सोहळ्यात रेड कार्पेटवरून जात असताना पत्रकारांनी तिच्याशी संवाद साधला होता. या प्रश्नोत्तरांमध्ये ती एका पत्रकारावर चांगलीच भडकली. या घटनेचा व्हिडिओदेखील व्हायरल झाला होता. ज्यात तापसी असं म्हणत आहे की, ‘ओरडू नका कृपा करून नाहीतर नंतर म्हणाल कलाकारांना धड नीट बोलण्याची सवय नाही’.

“मी सात महिने घरात…”; सई ताम्हणकरचा मानसिक तणावाबद्दल मोठा खुलासा

तापसी आणि पत्रकार यांच्यात वाद नवा नाही, ‘दोबारा’ चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान एका फोटोग्राफरनं तिला कार्यक्रमासाठी उशीर झाल्याचे सांगत तिच्याशी वाद घातला. तापसी शेवटची दोबारा चित्रपट दिसली होती. हा चित्रपट अनुराग कश्यपने दिग्दर्शित केला होता आणि ५० कोटी या चित्रपटाचं बजेट होतं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तापसीने आजवर वेगवेगळ्या धाटणीच्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. शाबाश मिठू, हसीन दिलरुबा, थप्पड, जुडवा २, पिंक या चित्रपटांमध्ये काम केले आहे. तापसी मूळची दिल्लीची असून पेशाने ती इंजिनियर आहे, मात्र तिने आपल्या करियरची सुरवात मॉडेलिंग क्षेत्रापासून केली आहे. आजवर तिने अनेक पुरस्कार पटकविले आहेत.