अभिनेत्री विद्या बालनने आजवर बॉलीवूडला अनेक सुपरहिट चित्रपट दिले. तिच्या अभिनयाचे लाखो चाहते आहेत. विद्याच्या सौंदर्याचेही सगळेच जण तोंडभरून कौतुक करतात. विद्याने बॉलीवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर स्वतःला सिद्ध करण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली. पण या प्रवासादरम्यान तिला अनेक कठीण प्रसंगांचा सामना करावा लागला. संघर्ष काळातील अशीच एक धक्कादायक घटना विद्या बालनने सांगितली आहे.

हेही वाचा- Video : IPL चा सामना पाहण्यासाठी शाहरुख खान लेकीसह मैदानात, ‘झूमे जो पठाण’ गाणं वाजलं अन्…

त्या चित्रपटानंतर विद्या लोकांसाठी बनली कमनशिबी

विद्याला मोहनलालच्या विरुद्ध मल्याळम् चित्रपटात भूमिकेची ऑफर देण्यात आली होती. परंतु दुर्दैवाने हा चित्रपट रद्द करण्यात आला. याशिवाय इतर अनेक प्रोजेक्ट्ससाठी अनौपचारिकपणे तिच्याशी संपर्क साधण्यात आला होता. पण एकदा रद्द झालेल्या चित्रपटाबाबत अफवा पसरू लागल्या आणि विद्याला लोक अपशकुनी म्हणून लोक हिणवू लागले. त्यामुळे विद्याच्या हातून अनेक चित्रपट गेले.

हेही वाचा- “फक्त अनुष्का शर्माच नाही तर…”; सुशांत राजपूतचं उल्लेख करत अभिनेत्याने करण जोहरला सुनावलं, म्हणाला..

विद्या म्हणाली, लोक सतत मला अपशकुनी म्हणत असल्यामुळे माझा स्वतःवरचा विश्वास उडाला. तो एक कठीण काळ होता. मला खूप नकारांचा सामना करावा लागला. तरीही मी जाहिरात चित्रपट करत होते. मी प्रदीप सरकारला भेटले आणि पहिल्याच दिवशी त्यांनी मला माझ्याबरोबर चित्रपट बनवणार असल्याचे सांगितले. मी ‘परिणीता’ चित्रपट निवडला नव्हता, चित्रपटाने माझी निवड केली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

न्यूड फोटोशूटमुळे विद्या ट्रोल

विद्या बालनने गेल्याच महिन्यात न्यूड फोटोशूट करीत सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. विद्याने डब्बू रत्नानीच्या कॅलेंडर फोटोशूटसाठी न्यूड पोझ दिल्या होत्या. विद्याचं हे न्यूड फोटोशूट पाहून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली होती. नेहमी टॉयलेटमध्ये मी अशीच पोझ देतो, विद्याची कमाल, असे कलाकार कोणाचे आदर्श असू शकत नाहीत, ‘द डर्टी’ चित्रपटाची आठवण आली, हे तुला शोभतं का? अशा कमेंट नेटकऱ्यांनी केल्या होत्या. तर काही जण हा फोटो जुना असल्याचं म्हणलं होतं.