बॉलीवूडमध्ये ‘इश्कजादे’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणारा अभिनेता अर्जुन कपूर हा आज ३८ वर्षांचा झाला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अर्जुन अभिनेत्री मलायका अरोराबरोबर रिलेशनशिपमध्ये आहे. अर्जुनच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या मित्रमंडळींनी खास पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीमध्ये मलायका तिच्या लोकप्रिय गाण्यावर डान्स करताना दिसली.

हेही वाचा : “मरेपर्यंत संघर्ष आहेच” ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम पृथ्वीक प्रतापचे स्पष्ट मत; म्हणाला, “खिशात पैसे…”

अर्जुन कपूरच्या वाढदिवसाच्या पार्टीचे आयोजन काल रात्री १२ नंतर करण्यात आले होते. त्याच्या पार्टीला इंडस्ट्रीमधील त्याचे जवळचे मित्र, गर्लफ्रेंड मलायका, त्याची बहीण अंशुला आणि तिचा प्रियकर असे सगळेजण उपस्थित होते. अभिनेत्याच्या वाढदिवसाच्या पार्टीतील इनसाइड व्हिडीओ पापाराझी इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.

हेही वाचा : “५७ व्या वर्षी चित्रपटात एवढे स्टंट कसे करतोस?” चाहत्याच्या प्रश्नाला उत्तर देत शाहरुख खान म्हणाला, “भाई मी खूप पेनकिलर…”

अर्जुन कपूरच्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये मलायका अरोरा तिच्या ‘दिल से’ चित्रपटातील ‘छैय्या छैय्या’ या लोकप्रिय गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. पार्टीतील मलायकाच्या डान्सचा व्हिडीओ सध्या सर्वत्र व्हायरल होत असून, अनेकांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. एका युजरने “तुझा मुलगा काय विचार करत असेल?” असा प्रश्न या व्हायरल व्हिडीओवर कमेंट करीत विचारला आहे, तर इतर युजर्सनी “ही लोकं किती पागल आहेत…”, “मलायकाचा मुलगा अर्जुनचा बाप म्हणून स्वीकार करेल का?” अशा प्रतिक्रिया या व्हिडीओवर दिल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, अर्जुन कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले. तर तो शेवटचा ‘कुत्ते’ या चित्रपटात दिसला होता. यामध्ये अर्जुनने तब्बू आणि राधिका मदानबरोबर काम केले होते. लवकरच अभिनेता ‘मेरी पत्नी का रिमेक’ चित्रपटात झळकणार आहे.