बॉलिवूडमध्ये स्वतःची खास ओळख निर्माण करणाऱ्या नेहा कक्करच्या आवाजाचे लाखो चाहते आहेत. नेहाने एकाहून एक सरस अशी गाणी गायली आहेत. नेहाचे चाहतेही तिच्याशी संबंधित सर्व काही जाणून घेण्यासाठी खूप उत्सुक असतात. सध्या नेहा तिच्या घराच्या रेनोवेशनमध्ये व्यस्त आहे. आपलं नवीन घर सजवण्यात नेहा सध्या व्यस्त आहे. अलीकडेच नेहा अंधेरी, मुंबई येथे तिच्या आलीशान घराच्या सजावटीसाठी खरेदी करताना दिसली.

सोशल मीडियावर तिचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये घरात डेकोरेशनसाठी नेहा बरंच शॉपिंग करताना दिसत आहे. नेहा काळ्या ट्रॅकसूटमध्ये आहे तसंच तिने मास्क आणि गॉगलही लावला आहे. नेहा दिसताच पापाराझींनी तिच्यापाशी घोळका केला आणि तिला फोटोसाठी पोज द्यायला विनंती केली. नेहाने मात्र फोटोसाठी त्यांना नकार दिला असून ती तिथून निघून गेली.

आणखी वाचा : Pathaan Box Office Collection : ‘पठाण’ची लवकरच होणार ३०० कोटी क्लबमध्ये एन्ट्री; सोमवारीही चित्रपटाची जबरदस्त कमाई

खरंतर नेहा एका सामान्य अवतारात तिथे दिसली त्यामुळे तिने फोटो काढण्यास नकार दिला. नेहा त्यांना म्हणाली, “जेव्हा माझा अवतार ठीक नसतो तेव्हाच तुम्ही माझे फोटोज क्लिक करायला येता.” नेहाने मास्क काढून फोटो क्लिक करण्यासाठी नकार दिला ती म्हणाली, “माफ करा पण मी आत्ता फोटो देण्याच्या स्थितीत नाही.”

View this post on Instagram

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नुकतंच नेहाने दुबईच्या एका कॉन्सर्टचे फोटो तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले होते. जागरण कार्यक्रमात भजन गणारी नेहा आज बॉलिवूडची टॉपची गायिका झाली आहे. नेहाने बरीच सुपरहीट गाणी दिली आहेत, याबरोबरच जुन्या गाण्यांच्या रिमिक्समध्ये नेहाचं खूप मोठं योगदान आहे. नुकतंच फाल्गुनी पाठकच्या एका जुन्या गाण्याच्या काही ओळी नेहाने तिच्या गाण्यात वापरल्या होत्या यावरून मध्यंतरी चांगलाच वाद पेटला होता.