Athiya Shetty Birthday: बॉलीवूड अभिनेता सुनील शेट्टी ९० च्या दशकातील आघाडीचा अभिनेता आहे. त्याने आपल्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट दिले. आपल्या अभिनयाने त्याने इंडस्ट्रीत स्वतःचं स्थान निर्माण केलं आहे. सुनीलचे जगभरात चाहते आहेत. सुनीलचं फिल्मी करिअर खूप यशस्वी राहिलं. मात्र तेवढं यश त्याच्या लेकीला मिळालं नाही. ९ वर्षांपूर्वी फिल्मी करिअरची सुरुवात करणारी अथिया मोजक्याच चित्रपटात दिसली. मात्र तिचे सर्वच चित्रपट फ्लॉप झाले.

५ नोव्हेंबर १९९२ रोजी जन्मलेल्या अथिया शेट्टीचा आज ३२ वा वाढदिवस आहे. तिच्या वाढदिवसानिमित्त तिचं फिल्मी करिअर व तिची नेटवर्थ किती याबाबत जाणून घेऊयात.

हेही वाचा – लग्नानंतर ९ वर्षांनी आई झाली प्रसिद्ध अभिनेत्री, पहिल्यांदाच शेअर केला गोंडस लेकीचा फोटो

अथिया शेट्टीचे फिल्मी करिअर

सुनील शेट्टीची लाडकी लेक अथिया शेट्टीने नऊ वर्षांपूर्वी आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली होती. तिने २०१५ मध्ये ‘हीरो’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं. यात तिच्याबरोबर सूरज पांचोली मुख्य भूमिकेत होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल आदळला होता. चित्रपटाने फक्त ३३.३७ कोटी रुपयांची कमाई केली होती. यानंतर दोन वर्षांनी ती पुन्हा रुपेरी पडद्यावर दिसली होती. २०१७ मध्ये आलेल्या ‘मुबारकां’ फिल्ममध्ये ती झळकली. यात तिच्याबरोबर अर्जुन कपूर होता. हा चित्रपटही फ्लॉप झाला. यानंतर तिने नवाजुद्दीन सिद्दिकीबरोबर ‘मोतीचूर चकनाचूर’ नावाचा चित्रपट केला. मात्र तोही फ्लॉप झाला. या चित्रपटांव्यतिरिक्त ती ‘नवाबजादे’ मधील एका गाण्यात झळकली होती.

हेही वाचा – ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम पृथ्वीक प्रतापची पत्नी काय काम करते? प्राजक्ताचे शिक्षण किती? म्हणाली, “मी ९ वर्षांपासून…”

अथियाने केएल राहुलशी केलं लग्न

अथिया शेट्टीने दोन वर्षांपूर्वी क्रिकेटपटू केएल राहुलशी लग्न केलं. दोघांचे लग्न खूप चर्चेत राहिले होते. या लग्नाला फक्त दोघांचे कुटुंबीय आणि काही जवळचे लोक उपस्थित राहिले होते.

हेही वाचा – घटस्फोटित अभिनेत्रीने ११ वर्षांनी मोठ्या आध्यात्मिक गुरूशी केलं दुसरं लग्न, फोटो झाले व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अथिया शेट्टीची संपत्ती किती?

अथिया शेट्टीचं फिल्मी करिअर फार चांगलं राहिलं नाही, मात्र तिची संपत्ती कोट्यावधी रुपयांची आहे. कोईमोईच्या रिपोर्टनुसार, अथिया जवळपास ३० कोटी रुपयांच्या संपत्तीची मालकीण आहे. ती विविध ब्रँड्सच्या जाहिराती व युट्यूब चॅनलद्वारे चांगली कमाई करते. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती इन्स्टाग्रामवर ब्रँड्सचे प्रमोशन करते, त्याचेही तिला पैसे मिळतात.