‘छावा’ चित्रपट प्रदर्शित होऊन २१ दिवस झाले आहे. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिक विकी कौशलने साकारली आहे. १४ फेब्रुवारीला प्रदर्शित झालेला हा चित्रपट बॉक्स ऑफिस गाजवत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळत आहे, चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक सिनेमागृहांमध्ये गर्दी करत आहेत. या चित्रपटाने दोन ब्लॉकबस्टर चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले आहेत.

‘छावा’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. फक्त देशातच नाही तर जगभरात हा चित्रपट जबरदस्त कमाई करत आहे. या चित्रपटाने तिसऱ्या आठवड्यात दोन ब्लॉकबस्टर चित्रपटांपेक्षा जास्त कमाई केली आहे.

छावाचे कलेक्शन स्त्री २ पेक्षा जास्त

समीक्षक तरण आदर्श यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून याबाबत माहिती दिली आहे. ‘छावा’ने तिसऱ्या आठवड्यात दोन मोठ्या चित्रपटांच्या कलेक्शनला मागे टाकलं आहे. स्त्री २ ने तिसऱ्या आठवड्यात बॉक्स ऑफिसवर ७२.८३ कोटी रुपयांचे कलेक्शन केले होते. तर बाहुबली २ ने हिंदीत ६९.७५ कोटी रुपयांची कमाई केली होती. या दोन्ही चित्रपटांच्या कलेक्शनपेक्षा ‘छावा’ने तिसऱ्या आठवड्यात जास्त कमाई केली आहे. छावाने तिसऱ्या आठवड्यात तब्बल ८४.९४ कोटी रुपये कमावले आहेत.

हेही वाचा – आलिया भट्ट बाल्कनीतून इतरांच्या घरात डोकावते, स्वतःच्या विचित्र सवयीबद्दल म्हणाली, “मी त्यांच्या बेडरूममध्ये…”

तिसऱ्या आठवड्यात ८४.९४ कोटींची कमाई करून ‘छावा’ हा दुसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. तर अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा २’ हा पहिल्या क्रमांकावर आहे. या चित्रपटाने तिसऱ्या आठवड्यात १०७.७५ कोटी रुपयांची कमाई केली होती.

हेही वाचा – “छावामध्ये जखमांवर मीठ चोळताना…”, ‘कवी कलश’ साकारणाऱ्या अभिनेत्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, “जी क्रूरता…”

‘छावा’ने २१ व्या दिवशी ५.५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. चित्रपटाने भारतात आतापर्यंत ४८३.५५ कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे. तर जगभरात या चित्रपटाने ५७७.५० कोटी रुपये कमावले आहेत.

हेही वाचा – Chhaava: ‘छावा’ ठरला यंदाचा सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा, एकूण कलेक्शन किती? वाचा…

‘छावा’बद्दल बोलायचे झाल्यास या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांचा जीवन प्रवास दाखवण्यात आला आहे. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित या चित्रपटात विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत आहे. तर दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदानाने महाराणी येसूबाईंची भूमिका केली आहे. औरंगजेबाची भूमिका अभिनेता अक्षय खन्नाने केली आहे. या चित्रपटात विनीत कुमार सिंह, संतोष जुवेकर, दिव्या दत्ता, आशुतोष राणा, डाएना पेंटीसह अनेक कलाकारांची मांदियाळी आहे.