Chhaya Kadam : रहस्यमयी आणि गूढ कथानक असलेल्या बारदोवी या सिनेमाचा ट्रेलर रिलिज झाला आहे. या सिनेमाचा ट्रेलर पाहून आपल्याही अंगावर काटा येईलच. मराठी अभिनेत्री छाया कदम Chhaya Kadam यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. तसंच या सिनेमात त्यांची भूमिकाही असणार आहे. गूढ, अतर्क्य घटना आणि मंत्रतंत्र या सगळ्याची झलक ट्रेलरमध्ये पाहण्यास मिळते आहे. ट्रेलरने सिनेमात नेमकं काय असेल? कशा पद्धतीने घडेल याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

‘बारदोवी’ सिनेमाचा ट्रेलर सोशल मीडियावर लाँच

करण शिवाजीराव चव्हाण यांनी सिनेमाचं दिग्दर्शन आणि लेखन केलं आहे. सतोरी एन्टरनेन्मेंट प्रस्तुत बारदोवी या सिनेमाची निर्मिती संदीप काळे, शिवाजी वायकर, कृष्णार्पण मोशन पिक्चर्स, शुभारंभ मोशन पिक्चर्स यांनी केली आहे छाया कदम Chhaya Kadam सिनेमाच्या सहनिर्मात्या आहेत.

सिनेमात कोण कोण कलाकार दिसणार?

बारदोवी सिनेमात आपल्याला छाया कदम, चित्तरंजन गिरी, विराट मडके हे कलाकार दिसणार आहेत. हिंदीतला एक आगळावेगळा चित्रपट अशी या सिनेमाची ओळख तयार होणार आहे. तसंच या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये एक खास गोष्टही कळते ती काय आहे यासाठी ट्रेलर पहावा लागेल.

हे पण वाचा कान महोत्सव गाजवणाऱ्या अभिनेत्री छाया कदम यांचा सत्कार

छाया कदम Chhaya Kadam यांनी लापता लेडीज या सिनेमात मंजूमाई भूमिकेत झळकल्या होत्या. त्याचप्रमाणे मडगाव एक्स्प्रेस सिनेमातही त्यांनी खास भूमिका केली होती. सैराट, फँड्री, सरला एक कोटी, न्यूड, हंपी या सिनेमांतल्या त्यांच्या भूमिकाही गाजल्या. आता त्या निर्मिती क्षेत्रात उतरल्या आहेत.

Chhaya Kadam In movie bardovi
छाया कदम बारदोवी सिनेमाच्या ट्रेलरमध्ये

सिनेमाच्या ट्रेलरमध्ये काय?

एक माणूस सांगतो की आई मला स्वप्नात दिसते आहे. तिचे गुरु आहेत आणि शिष्य आहेत. खूप विचित्र स्वप्न होतं पण खरं वाटलं. असं एक माणूस सांगतो, त्याचं नाव अनंत असतं. त्यानंतर काही प्रतिमा समोर येतात. मांत्रिक, पुढे पेटलेला यज्ञ, अघोर पूजा हे सगळं सगळं दिसतं. छाया कदम यांची भूमिका या सिनेमात स्पेशल असेल हे ट्रेलरच सांगतो आहे. ट्रेलर पाहून अंगावर काटा येतोच यात शंका नाही. बारदोवी हे नाव का दिलं गेलं? याचं गूढही सिनेमाच उलगडू शकणार आहे.

View this post on Instagram

A post shared by Chhaya Kadam (@chhaya.kadam.75)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२ ऑगस्टला हा सिनेमा रिलिज होतो आहे. एका खास अनुभवासाठी तयार राहा असं म्हणत छाया कदम Chhaya Kadam यांनी या सिनेमाचा फर्स्ट लूक शेअर केला होता. आता त्यांनी या सिनेमाचा ट्रेलर पोस्ट केला आहे. या सिनेमात काय काय असेल याची उत्सुकता निर्माण झाली आहे. रहस्यमयी सिनेमा आहे हे तर स्पष्ट होतं आहे.