प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांनी नेहमीच त्यांच्या चित्रपटातून सामाजिक मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. आता तब्बल ९ वर्षांनी ते ‘गांधी-गोडसे एक युद्ध’ हा चित्रपट प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहेत. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाची एक झलक पाहायला मिळाली होती. या चित्रपटात मराठमोळा अभिनेता, दिग्दर्शक चिन्मय मांडलेकर नथुराम गोडसेची भूमिका साकारत आहे.

या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. टीझरच्या सुरवातीलाच गांधी वधाचा सीन दाखवण्यात आला आहे, त्यानंतर नथुरामला अटक होऊन तो तुरुंगात दाखवण्यात आला आहे. मात्र यात एक वेगळा प्रयोग केला गेला आहे तो म्हणजे नथुराम आणि गांधी यांच्यातील वैचारिक मतभेद दाखवले आहेत. या चित्रपटातून त्यांच्यातील विचारांमधील युद्ध समोर येणार आहे.

आणखी वाचा : “त्यात प्रचंड नग्नता…” सलमानबरोबर झळकलेल्या स्नेहा उल्लालला ऑफर झालेला हॉलिवूड चित्रपट, अभिनेत्रीचा खुलासा

हा टीझरसुद्धा प्रेक्षकांना चांगलाच आवडला आहे. चिन्मय मांडेलकरने हा टीझर त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. चिन्मयच्या या पोस्टखाली त्याच्या चाहत्यांनी त्याच्या कामाची प्रचंड प्रशंसा केली आहे. ऐतिहासिक चित्रपटात काम करून बरेच मुद्दे मांडणाऱ्या चित्रपटात काम करण्याचा सल्ला चाहत्यांनी त्याला दिला आहे. काही लोकांना या चित्रपटाची संकल्पना पटलेली नाही, पण बहुतांश लोक यासाठी प्रचंड उत्सुक आहेत.

चिन्मय मांडलेकरने साकारलेला नथुराम आजवरचा उत्तम नथुराम असल्याचं काही लोकांनी म्हंटलं आहे. तर एका युझरने चिन्मयची तुलना थेट बॉलिवूड अभिनेते प्राण यांच्याशी केली आहे. “डोळ्यातून बोलणारा, केवळ डोळ्यातून अभिनय करणारा प्राण साहेबांनंतर चिन्मय मांडलेकर हाच एकमेव सशक्त अभिनेता आहे.” असं त्याच्या चाहत्याने कॉमेंटमध्ये लिहिलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
chinmay mandlekar fan reaction
chinmay mandlekar fan reaction

चित्रपटाचा टिझर नक्कीच उत्कंठावर्धक आहे. या चित्रपटातून दोन मत प्रवाह पाहायला मिळणार आहेत. या चित्रपटाची पटकथा दिग्दर्शन राजकुमार संतोषी यांचं असून ए आर रहमान यांनी चित्रपटाला संगीत दिलं आहे. पुढच्या वर्षी प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर म्हणजेच २६ जानेवारी २०२३ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.