बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस सध्या तिच्या ‘बेसोस’ या म्युझिक व्हिडीओमुळे प्रचंड चर्चेत आहे. ८ मे रोजी हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या म्युझिक व्हिडीओमध्ये जॅकलिनचे जबरदस्त हावभाव आणि तिचा भन्नाट डान्स पाहायला मिळत आहे. या गाण्यात जॅकलिनच्या जोडीला एक खास व्यक्ती झळकली आहे. तो कोणी अभिनेता नसून भारताचा माजी क्रिकेटपटू आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात…

भारताचा ‘गब्बर’ क्रिकेटपटू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिखर धवनने २४ ऑगस्ट २०२४ मध्ये देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यावर अभिनेत्याने आता बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं आहे. जॅकलिनबरोबर ‘बेबोस’ गाण्यात शिखर धवन झळकला आहे. या गाण्यात शिखरचा हटके अंदाज सर्वांना पाहायला मिळत आहे.

‘बेबोस’ हे गाणं प्रसिद्ध गायिका श्रेया घोषाल आणि आंतरराष्ट्रीय आर्टिस्ट कार्ल वाईन यांनी गायलं आहे. जॅकलिन आणि शिखर या अनोख्या जोडीची केमिस्ट्री पाहण्यासाठी त्यांचे सगळेच चाहते उत्सुक होते. अखेर ८ मे रोजी सकाळी ११ वाजता हे गाणं प्ले डीएमएफच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर प्रदर्शित करण्यात आलं. या गाण्यात शिखरने जॅकलिनबरोबर जबरदस्त ठुमके लगावल्याचं पाहायला मिळत आहे.

जॅकलिन आणि शिखरची जबरदस्त केमिस्ट्री ‘बेबोस’ या गाण्यात पाहायला मिळत आहेत. नेटकऱ्यांनी या गाण्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. “शिखर धवन काय कमबॅक आहे मस्त…”, “शिखर धवन+ जॅकलिन फर्नांडिस+ श्रेया घोषाल = ब्लास्ट”, “श्रेया घोषाल कधीच चाहत्यांचा अपेक्षाभंग करत नाही, किती सुंदर आवाज आहे”, “जॅकलिन आणि शिखर किती मस्त”, “जॅकलिन परफेक्ट डान्सर आहे”, “शिखर धवन वॉव इम्प्रेसिव्ह”, “गब्बर इज बॅक” अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर केल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, शिखर धवन याने त्याचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना १० डिसेंबर २०२२ रोजी बांगलादेशविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत खेळला होता. यानंतर २४ ऑगस्ट २०२४ त्याने क्रिकेट विश्वातून निवृत्ती घेतली.