आजचा दिवस हा भारतासाठी ऐतिहासिक दिवस ठरणार आहे. काही दिवसांपूर्वी अंतराळात उड्डाण केलेलं भारताचं चंद्रयान ३ हे आज चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्याच्या तयारीत आहे. आता याबद्दल प्रत्येकाच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. सोशल मीडियावर याची खूप चर्चा आहे. अनेक कलाकरांनीही याबद्दल प्रतिक्रिया दिल्या आहेत. अभिनेता आर. माधवनने ट्वीट करत या मोहिमेसाठी घेतलेल्या अथक प्रयत्नांसाठी इस्रोचं अभिनंदन केलं आहे. याचबरोबर विकास इंजिनसाठी त्याने नांबी नारायण यांचंही अभिनंदन केलं आहे.

दोन वर्षांपूर्वी आर. माधवन शास्त्रज्ञ नांबी नारायण यांच्या जीवनावर आधारित रॉकेट्री: द नांबी इफेक्ट’ हा चित्रपट घेऊ आला होता. त्यात त्याने नांबी नारायण यांची भूमिका साकारली होती. या चित्रपटातून नांबी नारायण यांनी इस्रोमध्ये केलेल्या योगदान आणि विकास इंजिन बनवण्यात ते कसे यशस्वी झाले हा सगळा प्रवास दाखवला आहे.

IPL 2024 Mumbai Indians vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
IPL 2024: धोनीच्या वादळी खेळीने आनंद महिंद्राही झाले चकित, माहीचे कौतुक करताना म्हणाले, “कृतज्ञ आहे की माझं नाव Mahi-ndra…”
A vision of changing politics in Chandrakat Khaire campaign
चंद्रकात खैरे यांच्या प्रचारात बदलत्या राजकारणाचे दर्शन
S Somnath
चांद्रयान ४ मोहिमेबाबत इस्रोच्या प्रमुखांकडून मोठी अपडेट; म्हणाले “पुढील टप्पा…”
three workers died due to electric shock
अंबरनाथ: विजेच्या धक्क्याने तीन कामगारांचा मृत्यू, जांभूळ जल शुद्धीकरण केंद्रातील घटना

आणखी वाचा : स्वतःच्या विद्यार्थिनीच्या प्रेमात पडला आणि आर माधवन झाला कोल्हापूरचा जावई, जाणून घ्या अभिनेत्याची फिल्मी लव्हस्टोरी

आर. माधवनने नुकतंच एक ट्वीट करत लिहिलं. “चंद्रयान 3 यशस्वी होणार. माझे शब्द लिहून घ्या. इस्रोचंही या यशाबद्दल आधीच अभिनंदन. मी खूप आनंदी आहे आणि मला अभिमान वाटतो आहे. नांबी नारायण यांचंही अभिनंदन. विकास इंजिनने या मोहिमेतही मोठं योगदान दिलं आहे.”

हेही वाचा : आर. माधवनचं पूर्ण नाव माहीत आहे का? घ्या जाणून…

दरम्यान, आज संध्याकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी चांद्रयान ३ चं लँडिंग संपूर्ण देशभरात या मोहिमेचं लाईव्ह टेलिकास्ट केलं जाणार आहे.