बॉलीवूडमधील ९० च्या दशकातील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे काजोल. काजोल आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर कित्येक वर्षं अधिराज्य गाजवत आहे. तिला अभिनयासाठी बरेच पुरस्कारही मिळाले आहेत. २०११ साली काजोलला ‘पद्मश्री’ पुरस्काराने गौरविण्यात आलं आहे.

गेल्यावर्षी काजोलने ओटीटी क्षेत्रात पदार्पण केलं. ‘लस्ट स्टोरीज २’ या चित्रपटाच्या माध्यमातून काजोलने ओटीटी माध्यमांत पाऊल ठेवलं. त्यानंतर ‘द ट्रायल’ या वेब सीरिजमध्ये ती पाहायला मिळाली. आपल्या अभिनयाबरोबर सौंदर्याने चाहत्यांना भुरळ पाडणाऱ्या काजोलच्या मोबाइलच्या वॉलपेपरवर कोणाचा फोटो आहे? माहितीये का?

हेही वाचा – यंदा ‘बिग बॉस ओटीटी’चं तिसरं पर्व रद्द! जाणून घ्या यामागचं कारण

नुकतीच काजोल लाल रंगाच्या साडीत दिसली. तिचे यादरम्यान अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पण एका व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या व्हिडीओमध्ये काजोलच्या मोबाइलवरचा वॉलपेपर पाहायला मिळत आहे.

काजोलच्या मोबाइल वॉलपेपरवर पती अजय देवगणचा फोटो नसून एका खास व्यक्तीचा फोटो आहे. ही व्यक्ती म्हणजे तिची लाडकी लेक. काजोलच्या मोबाइल वॉलपेपरवर न्यासा देवगणचा फोटो आहे. याचा व्हिडीओ ‘इंस्टंट बॉलीवूड’ या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.

हेही वाचा – पूजा हेगडेनं मायानगरी मुंबईत घेतलं नवं आलिशान घर, किंमत वाचून व्हाल थक्क

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काजोलच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियेचा पाऊल पडला आहे. कोणी काजोलच्या लाल रंगाच्या साडीतल्या लूकचं कौतुक करत आहे. तर कोणी तिच्या मोबाइलच्या वॉलपेपरवर कोण आहे? याचं अचूक उत्तर देताना दिसत आहे.