Deepika Padukone Admitted in Hospital for Delivery: बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणने काल शुक्रवारी (६ सप्टेंबर) सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. पती रणवीर सिंग, सासू सासरे आणि आई-वडील या सर्वांबरोबर दीपिका सिद्धिविनायकाच्या दर्शनाला पोहोचली होती. त्यानंतर आता अभिनेत्रीला डिलिव्हरीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तिचा पहिला व्हिडीओ समोर आला आहे.

पल्लव पालिवाल नावाच्या पापाराझी अकाउंटवरून एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत दीपिका पादुकोणची कार मुंबईतील एचएन रिलायन्स रुग्णालयात जाताना दिसत आहे. दीपिकाची आज प्रसुती होईल, असं म्हटलं जात आहे. काल कुटुंबाबरोबर गणरायाचे दर्शन घेतल्यानंतर आज गणेश चतुर्थीच्या शुभ प्रसंगी दीपिका बाळाला जन्म देणार असल्याचं म्हटलं जात आहे.

Video : आई-बाबा होण्याआधी रणवीर-दीपिकाने घेतलं सिद्धिविनायकाचं दर्शन; पारंपरिक अंदाजाने वेधलं लक्ष, व्हिडीओ व्हायरल

पाहा व्हिडीओ –

सहा वर्षांच्या संसारानंतर आता या जोडप्याच्या घरी नव्या सदस्याचं आगमन होणार आहे. नुकतंच रणवीर आणि दीपिकाने त्यांचं मॅटर्निटी फोटोशूट केलं होतं, त्याचे फोटोही खूप चर्चेत राहिले. दरम्यान, दीपिका व रणवीर कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करण्याआधी मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिराचं दर्शन घेतात. त्यांचं लग्न झालं तेव्हा त्यांनी सर्वात आधी सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले होते. काल शुक्रवारी दोघेही पुन्हा एकदा जोडीने कुटुंबासह बाप्पाच्या दर्शनाला आले होते, त्यावरून लवकरच दीपिकाची प्रसुती होईल असं म्हटलं जात होतं. आता दीपिकाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
Deepika Padukone ranveer singh
दीपिका पादुकोण व रणवीर सिंग यांचा फोटो (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)

दीपिका पादुकोण व रणवीर सिंग यांनी या वर्षाच्या सुरुवातीला फेब्रुवारी महिन्यात एक पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर करून ते आई-बाबा होणार असल्याची माहिती दिली होती. त्यानंतर अनेकदा दीपिका तिचा बेबी बंप फ्लाँट करताना दिसली होती. लग्नानंतर सहा वर्षांनी हे दोघे पहिल्या बाळाचे स्वागत करणार आहेत.