बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचा नातू व सनी देओलचा मुलगा करण याच्या लग्नाची गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा सुरु होती. करण देओल १८ जून रोजी त्याची गर्लफ्रेंड द्रिशा आचार्यबरोबर विवाहबंधनात अडकला. कुटुंबीय आणि काही मोजक्या मित्रमंडळींच्या उपस्थित करण-द्रिशाचा भव्य लग्नसोहळा संपन्न झाल्यावर सायंकाळी बॉलीवूड कलाकारांसाठी खास रिसेप्शन पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी करणच्या रिसेप्शनला बॉलीवूडची लोकप्रिय जोडी रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोणने हजेरी लावली होती.

हेही वाचा : ‘टिकू वेड्स शेरू’ चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी कंगना रणौतला आली इरफान खानची आठवण, अभिनेत्रीने शेअर केली भावुक पोस्ट

करण देओल आणि द्रिशा आचार्यच्या रिसेप्शन पार्टीमध्ये रणवीर-दीपिकाच्या डान्सने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. सध्या या दोघांच्या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. रिसेप्शनला रणवीरने व्हाइट शेरवानी, तर दीपिकाने काळ्या आणि सोनेरी रंगाचा असलेला ड्रेस परिधान केला होता. या पार्टीमध्ये रणवीर-दीपिकाने ‘ओम शांती ओम’ या गाण्यावर डान्स केला.

हेही वाचा : “प्रिय, बाबा तू कायम…” ‘फादर्स डे’ निमित्त जिनिलीयाने शेअर केली भावुक पोस्ट, रितेश देशमुख कमेंट करीत म्हणाला…

करण देओल आणि द्रिशा आचार्यच्या रिसेप्शनला बॉलीवूडमधील दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती. यावेळी रणवीर-दीपिकासह आमिर खान, सलमान खान, कपिल शर्मा उपस्थित होते. तसेच पार्टीमध्ये सुप्रसिद्ध गायक सोनू निगमने नवविवाहित जोडप्यासाठी खास गाणे गायले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, रणवीर सिंहचा ‘रॉकी और रानी की प्रेम’ कहाणी चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार असून यामध्ये करण देओलचे आजोबा आणि बॉलीवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र महत्त्वाची भूमिका साकारणार असून रणवीरबरोबर आलिया प्रमुख भूमिकेत दिसेल. तसेच दीपिका पदुकोण ‘फायटर’ आणि ‘प्रोजेक्ट के’ चित्रपटात दिसणार आहे.