दीपिका पदुकोण सध्या ‘पठाण’ चित्रपटातील ‘बेशरम रंग’ गाण्यामुळे चर्चेत आहे. या गाण्यामध्ये दीपिकाने परिधान केलेली भगव्या रंगाची बिकिनी विशेष लक्षवेधी ठरली. भगव्या रंगाच्या बिकिनीवरुन अनेक राजकीय मंडळींनी या चित्रपटाला विरोध दर्शवला. मात्र या सगळ्याकडे दीपिकाने दुर्लक्ष केलं आहे. आज ती टॉपची अभिनेत्री असली तरी एकेकाळी दीपिका आत्महत्येपर्यंत पोहोचली होती.

आणखी वाचा – “ती श्वास तरी घेत आहे ना?” एक महिन्याच्या लेकीची अवस्था पाहून सुप्रसिद्ध अभिनेत्री ढसाढसा रडली, रुग्णालयात नेलं अन्…

‘एटडीटीव्ही’च्या वृत्तानुसार, दीपिकाने स्वतः एका मुलाखतीदरम्यान या गोष्टीचा खुलासा केला होता. दीपिका म्हणाली, “मी माझ्या करिअरच्या एका टप्प्यावर पोहोचली होती. सगळं सुरळीत सुरू होतं. नैराश्य येण्याचं कोणतंच कारण नव्हतं. तरीही मी कारण नसताना रडायचे.”

“कधी कधी असेही दिवस होते की मला उठायचीही इच्छा होत नसायची. मी झोपूनच राहायचे. आत्महत्या करण्याचे विचारही माझ्या मनात यायचे. पण याचं सारं श्रेय मी माझ्या आईला देऊ इच्छिते. कारण तिने माझ्यामध्ये असलेली नैराश्येची लक्षणं ओळखली.”

आणखी वाचा – Video : चक्क ‘बिग बॉस’नेच घरामध्ये केला प्रवेश, पहिल्यांदाच असं काही घडलं की सदस्यही बघतच बसले

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दीपिका पुढे म्हणाली, “जेव्हा माझे आई-वडील मला भेटायला यायचे तेव्हा त्यांच्यासमोर सगळं ठीक आहे हे दाखवायला लागायचं.” पण आई-वडिलांपासून दीपिकाचं नैराश्य फार काळ लपून राहिलं नाही, आज बॉलिवूडचे अनेक सुपरहिट चित्रपट दीपिकाच्या नावे आहेत.