अजय देवगणची प्रमुख भूमिका असलेला सिंघम चित्रपट चांगलाच गाजला होता. रोहीत शेट्टी दिग्दर्शित या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली होती. यानंतर या चित्रपटाच्या दुसऱ्या भाग ‘सिंघम २’लाही प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला होता. आता या चित्रपटाचा तिसरा भाग ‘सिंघम अगेन’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान या चित्रपटातील दीपिका पादूकोणचा लूक प्रेक्षकांच्या समोर आला आहे.

हेही वाचा- जॅकलिन फर्नांडिससाठी नवरात्रीचे नऊ दिवस उपवास करणार सुकेश चंद्रशेखर; पत्र लिहित म्हणाला..,”माझी वाघीण…”

‘सिंघम अगेन’ चित्रपटात दीपिका लेडी सिंघमची भूमिका साकारणार आहे. नवरात्रीच्या शुभमुहुर्तावर दीपिकाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ‘सिंघम अगेन’मधील आपल्या लूकचा फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये दीपिका पोलिसांच्या गणवेशात दिसत आहे. दीपिकाच्या हातात बंदूक दिसत आहे. तर दुसऱ्या हातात तिने गुंडाचं डोक पकडलेलं दिसत आहे. हा फोटो शेअर करत दीपिकाने लिहिलं ‘भेटा शक्ती शेट्टीला’. सिंघम अगेनमध्ये दीपिका शक्ती शेट्टीची भूमिका साकारणार आहे.

काही दिवसांपूर्वीच ‘सिंघम अगेन’च्या शुटींगला सुरुवात झाली. याच्या मुहूर्ताचे फोटोज सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. रोहितसह अजय देवगण अन् सिंबाच्या लूकमध्ये रणवीर सिंगसुद्धा हजर होता. अजय आणि रणवीरबरोबर अक्षयकुमारची या चित्रपटात महत्वाची भूमिका असल्याचे सांगण्यात येत आहे. ‘सिंघम अगेन’ १५ ऑगस्ट २०२४ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. याच दिवशी अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा २’सुद्धा प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर नॉर्थ विरुद्ध साऊथ असा जबरदस्त मुकाबला पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

हेही वाचा- Video : “चुकीची कामं केल्यावर…”, पती राज कुंद्राबरोबरच्या ‘त्या’ व्हिडीओमुळे शिल्पा शेट्टी ट्रोल, नेटकरी म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दीपिकाच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर काही दिवासांपूर्वीच तिचा ‘जवान’ चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात दीपिकाबरोबर शाहरुख खानची मुख्य भूमिका होती. साऊथचा दिग्दर्शक अ‍ॅटलीने या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं होतं. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने १ हजार कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. ‘जवान’च्या या यशानंतर आता चाहते दीपिकाच्या ‘सिंघम अगेन’ चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहे.