अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांना गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी, म्हणजे ८ सप्टेंबर २०२४ रोजी कन्यारत्न प्राप्त झालं. या आनंदाच्या बातमीची माहिती या जोडप्याने सोशल मीडियावर शेअर करताच, संपूर्ण बॉलिवूडने त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. दीपिकाला ७ सप्टेंबरला गणेश चतुर्थीच्या दिवशी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, आणि तिने ८ तारखेला एका गोंडस मुलीला जन्म दिला. दीपिका आठवडाभर एच. एन. रिलायन्स रुग्णालयात दाखल होती, आणि अखेर आज १५ सप्टेंबर रोजी तिला डिस्चार्ज मिळाला.

दीपिका आणि तिच्या लेकीसह रणवीर सिंह अनेक गाड्यांच्या ताफ्यासह त्यांच्या घरी परतताना दिसले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यात एकूण चार गाड्या इमारतीत प्रवेश करताना दिसतात. गाड्यांच्या वेगामुळे दीपिका-रणवीरच्या चिमुकलीची झलक मात्र दिसली नाही. तरीही, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये दीपिका पांढऱ्या रंगाच्या पोशाखात दिसत असून, रणवीरने सुद्धा पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट परिधान केला आहे असं दिसतंय.

हेही वाचा…Video: शाहरुख खानने घेतली दीपिका-रणवीरची भेट, लेकीच्या जन्मापासून रुग्णालयातच आहे अभिनेत्री

दरम्यान,दीपिका रुग्णालयात असताना तिचा जवळचा मित्र शाहरुख खान तिला भेटायला गेला होता. त्याने दीपिका आणि रणवीरला शुभेच्छा दिल्या होत्या. याशिवाय, मुकेश अंबानी यांनीही रुग्णालयात जाऊन दीपिकाची भेट घेतली होती. दीपिका आणि रणवीरच्या कुटुंबीयांनी सुद्धा तिला भेट देऊन शुभेच्छा दिल्या होत्या.

दीपिकाने अपडेट केलं इन्स्टा बायो

दीपिका आई झाल्यापासून ती तिच्या लाडकीची काळजी घेण्यात व्यग्र आहे आणि ती हे सर्व ती आनंदाने करत आहे अस दिसत आहे. कारण तिने तिच्या सध्याच्या आयुष्याची अपडेट दिली आहे. “Feed, burp, sleep, repeat”. असे चार शब्द तिने तिच्या बायोमध्ये लिहिले आहेत. याचा अर्थ ती सध्या तिच्या लेकीला खाऊ घालतेय (स्तनपान करतेय) तिला ढेकर काढून झोपवते सध्या हे चक्र सुरू आहे अशा आशयाची दीपिकाची इंस्टाग्राम बायो आहे.

deepika padukone updates instagram bio
दीपिकाने तिची इन्स्टाग्राम बायो अपडेट केली आहे. (Photo Credit – Deepika Padukone Instagram)

हेही वाचा…Video : आई-बाबा होण्याआधी रणवीर-दीपिकाने घेतलं सिद्धिविनायकाचं दर्शन; पारंपरिक अंदाजाने वेधलं लक्ष, व्हिडीओ व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, दीपिका आणि रणवीरने त्यांच्या गोंडस मुलीच्या जन्माच्या एक दिवस आधी मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात जाऊन बाप्पाचे दर्शन घेतले होते. त्यांच्या मुलीचा जन्म झाल्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर ही माहिती पोस्ट केली होती. अजूनपर्यंत त्यांनी आपल्या लेकीचं नाव ठेवलं नाही, मात्र सोशल मीडियावर चाहत्यांकडून विविध नावांवर चर्चा सुरू आहे.