बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध जोडप्यांपैकी एक जोडपं म्हणजे दीपिका पदुकोण व रणवीर सिंग. दीपिका व रणवीर यांच्यामध्ये खऱ्या आयुष्यामध्येही कमाल केमिस्ट्री पाहायला मिळते. पुरस्कार सोहळा असो वा एखादा कार्यक्रम दोघंही एकमेकांचा हात हातात पडकडून फोटोंसाठी पोझ देताना दिसतात. तर रणवीरही खुलेपणाने दीपिकावर असलेलं प्रेम व्यक्त करताना दिसतो. पण सध्या या दोघांच्या एका व्हायरल व्हिडीओमुळे विविध चर्चा रंगत आहेत.
आणखी वाचा – Video : निक जोनसवर चाहतीनं फेकलं अंतर्वस्त्र, प्रियांका चोप्रानं असं काही केलं की…; व्हिडीओ व्हायरल
नेमकं काय घडलं?
‘इंडियन स्पोर्ट्स ऑनर्स २०२३’ या कार्यक्रमामध्ये दीपिका व रणवीर यांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमाला दीपिकाचे वडील प्रकाश पादुकोणही उपस्थित होते. दरम्यान दीपिकाच्या एका कृतीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. दीपिका व रणवीर रेड कार्पेटच्या दिशेने जात होते. यावेळी रणवीरने एकत्र पुढे जाण्यासाठी दीपिकाला हात दिला.
रणवीरने हात पुढे करताच दीपिकाने मात्र त्याकडे दुर्लक्ष केलं. ती तिच्या वडिलांसह पुढे गेली. दीपिकाच्या या कृतीवरुनच सध्या सोशल मीडियावर दीपिका व रणवीरच्या नात्याबाबत चर्चा रंगल्या आहेत. या दोघांमध्ये काहीतरी बिनसलं आहे, दोघांच्या नात्याचा लवकरच दी एण्ड होणार आहे, दीपिकाने रणवीरकडे दुर्लक्ष केलं आहे असं नेटकरी म्हणत आहेत.
शिवाय दीपिका व रणवीरचं नातं आता बदलत आहे असंही अनेकांनी म्हटलं आहे. याआधीही या दोघांच्या नात्याबाबत चर्चा रंगल्या होत्या. दीपिका व रणवीरचं नातं फार काळ टिकणार नाही असं बोललं जात होतं. मात्र त्यानंतर दोघांनीही सोशल मीडियाद्वारे पोस्ट शेअर करत या सगळ्या अफवांना उत्तर दिलं होतं.