शाहरुख खान व दीपिका पदुकोणच्या ‘पठाण’ चित्रपटांकडे प्रेक्षकांचं लक्ष लागून राहिलं आहे. या चित्रपटामधील काही दिवसांपूर्वीत प्रदर्शित झालेलं ‘बेशरम रंग’ गाणं वादाचा विषय ठरलं. आता या गाण्यानंतर चित्रपटामधील दुसरं गाणं प्रदर्शित झालं आहे. ‘झुमे जो पठाण’ असं या गाण्याचं नाव आहे. या गाण्याला प्रेक्षकांची सर्वाधिक पसंती मिळताना दिसत आहे.

आणखी वाचा – कधीकाळी एअर होस्टेस म्हणून नोकरी करायची ‘ही’ सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री, आता करते मालिकांमध्ये काम

‘बेशरम रंग’ गाण्यामध्ये दीपिकाने भगवी बिकिनी परिधान केल्यानंतर या चित्रपटाचा वाद चिघळला. त्यानंतर चित्रपटाच्या दुसरं गाणं प्रदर्शित झालं. या गाण्याचा प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळणार का? हाही प्रश्न होता. पण नकारात्मक प्रमोशनचा फायदा चित्रपटाला होत असल्याचं दिसत आहे.

‘झुमे जो पठाण’ गाणं प्रदर्शित होताच अर्ध्या तासातच एक मिलियनपेक्षा अधिक व्ह्युज मिळाले आहेत. या गाण्यामध्ये शाहरुख व दीपिकाची हटके केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. तर आरजित सिंगच्या आवाजातील हे गाणं प्रेक्षक पुन्हा पुन्हा ऐकत आहे.

वयाच्या ५७व्या वर्षी शाहरुख करत असलेलं काम त्याच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहेत. सोशल मीडियाद्वारे शाहरुखला त्याचे चाहते पाठिंबा देत आहेत एका युजरने म्हटलं की, बॉयकॉट गँग आता सांगा या गाण्यामध्ये काय चुका आहेत. आम्हालाही या गाण्यामध्ये चूक शोधून सापडली नाही. आता कसं करणार बॉयकॉट.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तर दुसऱ्या एका युजरने म्हटलं की, बॉयकॉट गँगने ‘झुमे जो पठाण’ गाणं पाहावं. तर शाहरुख व दीपिकाच्या केमिस्ट्रीचं व या नव्या गाण्याचं प्रेक्षकही कौतुक करत आहेत.