शाहरुख, सलमान, आमिर खान, आलिया भट्ट अशा बड्या कलाकारांना मागे काढत अभिनेत्री दीपिका पदुकोणने मोठी कामगिरी केली आहे. तिने IMDb च्या ‘मोस्ट व्ह्यूड इंडियन स्टार ऑफ द लास्ट डिकेड’ या यादीत सर्वोच्च स्थान पटकावलं आहे. गेल्या दहा वर्षांतील एकूण १०० कलाकारांच्या यादीत हिंदी, तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड कलाविश्वातील कलाकारांचा समावेश होता. यामध्ये दीपिकाने बाजी मारत पहिलं स्थान मिळवलं आहे. तिच्यानंतर या यादीत अनुक्रमे शाहरुख खान, ऐश्वर्या राय व इतर बॉलीवूड कलाकारांचा समावेश आहे.

IMDb ने २०१४ ते २०२४ या दरम्यानचा डेटा पाहून कलाकारांची ही यादी जारी केली आहे. २००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या शाहरुख खानच्या ‘ओम शांती ओम’ चित्रपटाद्वारे अभिनेत्रीने रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं आहे. त्याआधी अभिनेत्री मॉडेल म्हणून काम करायची. बॉलीवूडमध्ये काही वर्षे संघर्ष केल्यावर अभिनेत्रीच्या वाट्याला ‘कॉकटेल’, ‘ये जवानी हैं दिवानी’, ‘पिकू’, ‘चेन्नई एक्स्प्रेस’, ‘रामलीला’, ‘बाजीराव मस्तानी’, ‘पठाण’, ‘जवान’ आणि ‘पद्मावत’ असे सुपरहिट चित्रपट आले. २०१७ मध्ये दीपिकाने ‘XXX: रिटर्न ऑफ जेंडर केज’ या चित्रपटाद्वारे हॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं. हॉलीवूड पदार्पणामुळे अभिनेत्री ग्लोबल स्टार म्हणून ओळखली जाऊ लागली.

हेही वाचा : Video: ‘पुष्पा २’ चित्रपटामधील श्रेया घोषालच्या आवाजातील दुसरं गाणं प्रदर्शित, अल्लू अर्जुन व रश्मिका मंदानाच्या हूक स्टेपने वेधलं लक्ष

IMDb वरील ‘मोस्ट व्ह्यूड इंडियन स्टार्स ऑफ द लास्ट डिकेड’, पाहा २० कलाकारांची यादी

भारतीय कलाकार

  • दीपिका पदुकोण
  • शाहरूख खान
  • ऐश्वर्या राय बच्चन
  • आलिया भट्ट
  • इरफान खान
  • आमिर खान
  • सुशांत सिंह राजपूत
  • सलमान खान
  • हृतिक रोशन
  • अक्षय कुमार
  • कतरिना कैफ
  • अमिताभ बच्चन
  • समंथा रूथ प्रभू
  • करीना कपूर
  • तृप्ती डीमरी
  • तमन्ना भाटिया
  • रणबीर कपूर
  • नयनतारा
  • रणवीर सिंह
  • अजय देवगण

हेही वाचा : Happy Birthday ताई! गौतमी देशपांडेने लाडक्या बहिणीसाठी शेअर केला मजेशीर व्हिडीओ, मृण्मयीबद्दल म्हणाली…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, सध्या दीपिकाचे चाहते अभिनेत्रीवर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. तिच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर दीपिकाची महत्त्वाची भूमिका असलेला ‘कल्की २८९८ एडी’ चित्रपट जून महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याशिवाय अभिनेत्री ‘सिंघम अगेन’ चित्रपटात सुद्धा झळकणार आहे. ‘सिंघम अगेन’मध्ये प्रेक्षकांना तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. याशिवाय अभिनेत्रीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचं झालं, तर रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण लग्नाच्या पाच वर्षांनंतर आई-बाबा होणार आहेत. सप्टेंबर महिन्यात अभिनेत्रीच्या घरी चिमुकल्या बाळाचं आगमन होणार आहे.