धर्मेंद्र आणि हेमा मालिनी बॉलीवूडमधील चर्चित कपल आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांच्या लग्नाला ४३ वर्षे पूर्ण झाली. आजही हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांची लव्हस्टोरीची चर्चा केली जाते. हेमा मालिनी यांच्याशी लग्न केलं तेव्हा धर्मेंद्र अगोदरच विवाहित होते. पण हेमा मालिनी यांच्याशी लग्न केल्यानंतरही धर्मेंद्र आणखी एका अभिनेत्रीच्या प्रेमात पडले होते. कोण होती ती अभिनेत्री? आणि काय आहे तो किस्सा, घ्या जाणून

हेही वाचा- ‘जवान’मध्ये नयनतारा करणार शाहरुखबरोबर रोमान्स, अभिनेत्रीच्या पतीने दिलेली प्रतिक्रिया चर्चेत, म्हणाला, “किंग खान…”

धर्मेंद्र अवघ्या १९ वर्षांचे असताना १९५४ मध्ये प्रकाश कौर यांच्याशी त्यांचा विवाह झाला होता. या जोडप्याला अजय सिंग, विजय सिंग, विजेता आणि अजिता देओल अशी चार मुले होती. त्यांचे वैवाहिक जीवन चांगले चालले होते. पण ८० च्या दशकात धर्मेंद्र हेमा मालिनी यांना भेटले आणि पहिल्याच भेटीत ते हेमा मालिनीच्या प्रेमात पडले.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोन लग्नानंतरही धर्मेंद्र यांच्या आयुष्यात तिसऱ्या महिलेची एन्ट्री झाली होती. ही महिला दुसरी कोणी नसून त्या काळातील सुंदर अभिनेत्री अनिता राज होती. धर्मेंद्र आणि अनिता यांनी ‘जलजला’, ‘करिश्मा कुदरत का’, ‘इन्सानियत के दुश्मन’ आणि ‘नौकर बीवी का’ इत्यादींसह अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले.

हेही वाचा- “ट्रेलरपेक्षा वाईट” रणवीर सिंह आणि आलिया भट्टचे ‘झुमका’ गाणे ऐकून नेटकरी भडकले; म्हणाले, “जुन्या गाण्याची पुन्हा…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

असे म्हटले जाते की, अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम करताना धर्मेंद्र आणि अनिता खूप जवळ आले होते. त्यावेळी धर्मेंद्र निर्माते आणि दिग्दर्शकांना अनिता राजला त्यांच्या चित्रपटांमध्ये घेण्याचा सल्ला देत होते. हेमा मालिनी यांना हे प्रकरण कळताच त्यांनी याला विरोध केला होता. यानंतरच धर्मेंद्र यांनी अनिता राजपासून अंतर ठेवल्याचे सांगण्यात येते.