बॉलीवूड स्टार आलिया भट्ट आणि रणवीर सिंह यांनी २०१९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गल्ली बॉय’ सिनेमात एकत्र काम केले होते. रणवीर-आलियाच्या फ्रेश जोडीने आणि त्यांच्या केमिस्ट्रीने प्रेक्षकांचे मन जिंकले. यामुळेच या दोघांचे चाहते आता ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या त्यांच्या आगामी चित्रपटाची प्रतीक्षा करीत आहेत.

हेही वाचा : मदर्स डे’निमित्त आर्या आंबेकरची खास पोस्ट, म्हणाली…

आलिया भट्ट, रणवीर सिंह, धर्मेंद्र आणि शबाना आझमी यांच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ चित्रपटात प्रमुख भूमिका असतील. चित्रपट रिलीज होण्यापूर्वी ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांनी अलीकडेच रणवीर सिंह आणि आलिया भट्ट यांच्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीबद्दल खुलासा केला आहे. ‘ई-टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत धर्मेंद्र यांनी सांगितले, “रणवीर-आलियाच्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीमध्ये नक्कीच एक जादू आहे. मला त्या दोघांकडे पाहून, मी आणि हेमा जेव्हा आधी एकत्र काम करायचो ते दिवस आठवले. ‘बहुत ही सुलझे हुए बच्चे है…’ त्यांना काय करायचे हे माहीत आहे. प्रेक्षकांना नक्कीच हेमा आणि माझी झलक रणवीर आणि आलियामध्ये पाहायला मिळेल.”

हेही वाचा : ‘मेट गाला’ मध्ये रॅम्पवॉकचा अनुभव सांगताना आलिया म्हणाली, “मी रेड कार्पेटवर पडणार…”

आलिया आणि रणवीरने ‘गल्ली बॉय’व्यतिरिक्त करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण सीझन-७’ या बहुचर्चित कार्यक्रमातही हजेरी लावली होती. या वेळी या चित्रपटसृष्टीत आम्ही दोघे एकमेकांचे ‘सखी’ आहोत असे आलियाने म्हटले होते. आलिया सध्या ‘गॅल गॅडोट’ आणि ‘जेमी डोरमन’सह ‘हार्ट ऑफ स्टोन’ या तिच्या हॉलीवूड पदार्पणाच्या रिलीजची तयारी करीत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ हा या वर्षातील बहुप्रतीक्षित चित्रपटांपैकी एक आहे. करण जोहर दिग्दर्शित ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ यापूर्वी २८ एप्रिल २०२३ रोजी रिलीज होणार होता, परंतु काही कारणास्तव आता हा चित्रपट जुलै २०२३ मध्ये मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होईल. या चित्रपटाच्या निमित्ताने बऱ्याच काळानंतर करण जोहर दिग्दर्शनात पुनरागमन करीत आहे.