‘कान्स चित्रपट महोत्सव २०२३’ निमित्ताने बॉलीवूड दिग्दर्शक अनुराग कश्यप सध्या चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपट महोत्सवात अनुरागचा आगामी चित्रपट ‘केनडी’चे स्क्रीनिंग करण्यात आल्याने त्याच्या या चित्रपटाबद्दल चर्चा सुरू आहे. नुकतंच या चित्रपटाचं एक खास स्क्रीनिंग मुंबईत आयोजित करण्यात आलं होतं. चित्रपटसृष्टीतील बऱ्याच बड्याबड्या लोकांनी या स्क्रीनिंगला हजेरी लावली.

मनोज बाजपेयी, विजय वर्मा, शबाना आजमी, शेखर कपूर, सुधीर मिश्रा, वरुण ग्रोव्हर, नीरज घायवान, पियुष मिश्रा अशा मोठमोठ्या लोकांनी या स्क्रीनिंगला हजेरी लावली. प्रत्येकालाच हा चित्रपट प्रचंड आवडला. प्रत्येकाने या चित्रपटाचे आणि अनुराग कश्यपचे तोंडभरून कौतुकही केले.

आणखी वाचा : “ते चौघेही मुस्लिम…” नसीरुद्दीन शाह यांनी सांगितला ‘A Wednesday’ चित्रपटादरम्यानचा ‘तो’ किस्सा

याबद्दल सुप्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक शेखर कपूर म्हणाले, “अनुराग कश्यपचा चित्रपट पाहून उत्साहीत झालो नाही असं आजवर कधीच घडलेलं नाही. परंतु त्याच्या या चित्रपटाने मला रडवलं आहे. मी या चित्रपटाचा भरपूर आनंद घेतला. चित्रपटाची कथा इतकी डार्क असूनही ती तितकीच गुंतवून ठेवणारी आहे, हे फार कमी दिग्दर्शकांना जमतं.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शेखर कपूर यांच्याबरोबरच सुधीर मिश्रा यांनीही चित्रपटाची प्रशंसा केली. त्यांनी तब्बल ४ वेळा हा चित्रपट पाहिल्याचं स्पष्ट केलं. या चित्रपटात सनी लिओनी आणि राहुल भट्टसारखे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. सनी चार्लीच्या भूमिकेत दिसणार आहे तर राहुल एका माजी पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. अद्याप चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख समोर आलेली नाही.