अभिनेत्री दिशा पटानी ही तिच्या कामापेक्षाही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत असते. गेले अनेक महिने ती अलेक्झांडर अॅलेक्स याला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. तो तिचा जीम ट्रेनर आहे. ती दोघं अनेकदा एकत्र फिरतानाही दिसतात. आता अशातच दिशाने त्या दोघांचा एक बाथरूममधील व्हिडीओ पोस्ट केला आहे.

दिशा आणि अलेक्झांडर बाथरूममध्ये बाथरोब घालून आणि डोक्याला टॉवेल बांधून एन्जॉय करताना दिसत आहे. एका गाण्यावर त्यांनी हा व्हिडीओ शूट केला आहे. ते इंग्रजी गाणं ‘डायलेमा’वर लीप सिंक करताना दिसत आहे. या व्हिडीओतून ते दोघं त्यांच्यातलं बॉण्डिंग सर्वांना दाखवत आहेत.

आणखी वाचा : “तुम्ही माझ्यासोबत असलात की…” जिनिलीयाने भर कार्यक्रमात लाजत घेतला रितेश देशमुखसाठी खास मराठमोळा उखाणा

दिशा पटानीने हा व्हिडीओ शेअर करत एक मजेशीर इमोजी कॅप्शन म्हणून टाकला. दिशाने पोस्ट केलेला हा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत असून तिच्या चाहत्यांप्रमाणेच अनेक सेलिब्रिटींनी या व्हिडीओवर कमेंट करत त्यांचा हा हटके अंदाज आवडल्याचं सांगितलं आहे.

हेही वाचा : दिशा पटानीची एक्स बॉयफ्रेंडच्या बहिणीबरोबर लंच डेट, दोघींना एकत्र पाहून नेटकरी म्हणाले, “तुझं पुन्हा…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या व्हिडिओवर कमेंट करत टायगर श्रॉफने एक हसण्याचे इमोजी पोस्ट केला आहे. तर एका नेतकऱ्याने लिहिलं, “टायगर श्रॉफला खूप दुःख होत असेल.” तर दुसरा नेटकरी म्हणाला, “हे काय बघण्याची वेळ आली आहे माझ्यावर!” तिचा हा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरला आहे.