बॉलिवूड किंवा एकंदरच चित्रपटसृष्टीत अभिनयापेक्षा शारीरिक सौंदर्याला महत्त्व दिलं जातं हे सत्य आहे. आज कित्येक अभिनेत्री या आघाडीवर असल्या तरी प्रत्येक अभिनेत्रीला या गोष्टीचा सामना कधी ना कधीतरी करावा लागलाच आहे. मग काही अभिनेत्री सर्जरीसारखे पर्याय निवडतात आणि शरीरात हवे तसे बदल करून घेतात, तर काही अभिनेत्री या केवळ अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतात. अशाच काही अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणजे दिव्या दत्ता.

सदैव आपल्या वेगळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडणाऱ्या दिव्या दत्ताच्या अभिनयाचं प्रचंड कौतुक होतं, पण नुकतंच तिने एका मुलाखतीमध्ये आपण रूढीबद्ध किंवा साचेबद्ध अभिनेत्रीपेक्षा वेगळी असल्याचा खुलासा केला आहे. चित्रपटसृष्टीत काम मिळवण्यासाठी एका अभिनेत्रीकडे ज्या गोष्टी हव्यात त्या तिच्याकडे नाहीत याबद्दलही तिने वक्तव्य केलं आहे. इतकंच नाही तर दिव्याने स्वतःच्या स्टाईल स्टेटमेंटबद्दल आणि आधीच्या काळात केलेल्या चुकांबद्दलही भाष्य केलं आहे.

आणखी वाचा : मुलांच्या जडणघडणीबद्दल शाहरुख खानचा मोठा खुलासा; म्हणाला, “आज माझे आई वडील असते तर…”

‘टाईम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये दिव्य म्हणते, “फॅशनच्या बाबतीत माझ्या आधीच्या दिवसांत मीदेखील बऱ्याच चुका केल्या आहेत. इतर साचेबद्ध अभिनेत्रींप्रमाणे माझ्याकडे कधीच त्या दृष्टिकोनातून कुणीच पाहिलं नाही. एक अभिनेत्री म्हणून ज्या गोष्टी हव्यात त्या कदाचित माझ्याकडे नव्हत्या. मी उंच नाही, मी busty आहे म्हणजे माझे स्तन मोठे आहेत. या गोष्टींचा सुरुवातीला मला त्रास झाला, पण नंतर यातून मीच मार्ग काढला.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याबरोबरच आपल्या कामाबद्दल बोलताना दिव्य म्हणाली, “तुमच्या कामाची जेव्हा लोक दखल घेतात तेव्हा तुमचा आत्मविश्वास वाढतो. शिवाय जसजसं मी माझ्या कामावर लक्षकेंद्रित केलं तसतसा मला कोणत्याप्रकारची वेशभूषा जास्त शोभून दिसते, नेमकं माझ्यावर काय योग्य दिसतं याचा अंदाज मला आला आणि माझ्यात झालेला हा बदल पाहून आज मलाच खूप बरं वाटतं.” दिव्याचा नुकताचा ‘अंत द एंड’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. शिवाय तिने ‘वीर जारा’ ‘दिल्ली ६’, ‘भाग मिल्खा भाग’ ‘धाकड’ या चित्रपटातही महत्त्वाची भूमिका निभावली आहे.