सनी देओलचा मोठा मुलगा करण देओल पाठोपाठ आता त्याचा लहान मुलगा राजवीर देओलही बॉलीवूडमध्ये पदापर्ण करणार आहे. नुकताच राजवीरचा दोनो चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला. हा चित्रपट ५ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटात राजवीरबरोबर अभिनेत्री पूनम ढिल्लन यांची मुलगी पालोमा मुख्य भूमिकेत आहे. ट्रेलर लॉन्च दरम्यान राजवीरला आजोबा धर्मेंद्र आणि आजी प्रकाश कौर यांनी एक महत्वाचा सल्ला दिला आहे.

हेही वाचा- “बॉलिवूड स्टार्स माझ्याबरोबर काम करण्यास उत्सुक पण…” अनुराग कश्यपचं वक्तव्य चर्चेत

दोनोच्या ट्रेलर लाँचला राजवीरबरोबर त्याचे वडील सनी, काका बॉबी देओल आणि भाऊ करण देओलही उपस्थित होते. यादरम्यान राजवीरने मीडियाशी संवाद साधला आणि आजी-आजोबांनी काय सल्ला दिला हे सांगितले. राजवीर म्हणाला की, “आजी-आजोबा खूप खूश होते. ते मला म्हणाले, तुझे व्यक्तिमत्व खूप चांगले आहे. वडिलांची प्रतिमा पाहू नको. त्यांच्यासारखे बनण्याचा प्रयत्न करू नकोतुझे पालनपोषण खूप चांगले झाले आहे. आजोबा आणि काकासारखे बनू नको.”

हेही वाचा- अनन्याबरोबर ब्रेक-अपनंतर ईशान खट्टरला मिळाली त्याची ‘ड्रीम गर्ल’; जाणून घ्या कोण आहे ती मिस्ट्री गर्ल?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चदरम्यान धर्मेंद्र यांनी राजवीरला शुभेच्छा देण्यासाठी एक व्हिडिओही पाठवला होता. व्हिडिओमध्ये धर्मेंद्र म्हणतात “सनीने मला एक दिवस सांगितले की, राजवीर चित्रपट करत आहे. हे ऐकून मला खूप आनंद झाला. राजवीर आणि पलोमा नवे कलाकार आहेत. चित्रपट चांगला चालावा अशी मी प्रार्थना करतो.”