शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. ७ सप्टेंबर रोजी प्रदर्शित झालेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. शाहरुख खानची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट खूपच चांगला आहे, असं कौतुक प्रेक्षक करत आहेत. ‘जवान’ने पहिल्याच दिवशी दमदार कमाई केली.

जगभरात ‘जवान’ने २४०.४७ कोटींची कमाई केल्याचं स्पष्ट झालं आहे. इतकंच नव्हे तर या चित्रपटाने पहिल्याच दिवशी १०० कोटींचा टप्पा पार केल्याच निर्मात्यांनी दावा केला होता. बॉक्स ऑफिसवर ‘जवान’ छप्परफाड कमाई करत आहे. चित्रपटातील संवाद, तसेच काही सीन्सची सोशल मीडियावर जबरदस्त चर्चाही सुरू आहे.

आणखी वाचा : ‘खुपते तिथे गुप्ते’च्या मंचावर सुप्रिया सुळे झाल्या भावूक; नव्या एपिसोडचा प्रोमो चर्चेत

शाहरुख खानच्या याच ‘जवान’बद्दल काही खास गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत ज्या अद्याप फारशा कोणालाच ठाऊक नाही. पहिली गोष्ट म्हणजे ‘जवान’च्या भूमिकेसाठी शाहरुख खानने दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत अल्लू अर्जुन व यश यांचे काही चित्रपट पाहिले याबरोबरच दिग्दर्शक अॅटलीच्याही काही चित्रपटांचा किंग खानने अभ्यास केला. दाक्षिणात्य चित्रपटातील पद्धती जाणून घेण्यासाठी शाहरुखने ही गोष्ट केली.

दुसरी गोष्ट म्हणजे चित्रपटात शाहरुख खान ‘बेकरार करके हमें यू न जाइये’ या गाण्यावर थीरकतान दिसत आहे. मजेची गोष्ट म्हणजे या गाण्यावरचा हा नाच खुद्द शाहरुखनेच कोरिओग्राफ केलेला आहे. तिसरी गोष्ट म्हणजे या चित्रपटाचा एडिटर रुबिनला शाहरुखने सांगितलं होतं की चित्रपटाची लांबी कमी करायची असल्यास माझे सीन्स कमी कर, पण इतरांचे सीन्स आहे तसेच राहू देत. चौथी आणखी एक मजेशीर गोष्ट म्हणजे या चित्रपटासाठी शाहरुखने प्रथम टक्कल केलं, अन् यानंतर त्याने खुद्द कबूल केलं की यापुढे तो कधीच असं करणार नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘जवान’ हा बॉलिवूडमधील सर्वाधिक ओपनिंग मिळवणारा चित्रपट ठरला आहे. याआधी हा रेकॉर्ड शाहरुखच्या ‘पठाण’ आणि सनी देओलच्या ‘गदर २’च्या नावे होता. या दोघांना मागे टाकत ‘जवान’ने बाजी मारली आहे. या चित्रपटात शाहरुख खान, नयनतारा व विजय सेतुपती यांच्या मुख्य भूमिका आहेत. याशिवाय यामध्ये प्रियामणी, सान्या मल्होत्रा, रिद्धी डोग्रा, आलिया, गिरीजा ओक यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. याशिवाय दीपिका पदुकोणचा कॅमिओदेखील आहे.