बॉलिवूड अभिनेता अजय देवगण मुख्य भूमिकेत असलेला ‘दृश्यम २’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. ‘दृश्यम’ चित्रपटाच्या या सिक्वेलसाठी प्रेक्षक प्रचंड आतुर होते. २०१४ मध्ये ‘दृश्यम’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाच्या उयकंठावर्धक कथेने सर्वांनाच भुरळ घातली. आता या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाचीही यशस्वी घोडदौड सुरु झाली आहे.

या चित्रपटाच्या प्रदर्शना आधीच याने नवे रेकॉर्ड करायला सुरुवात केली. पहिल्या दिवशी या चित्रपटाने ऑफिसवर मोठा गल्ला जमवला. आता त्या पाठोपाठ दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे.

आणखी वाचा : Video: लेकीच्या साखरपुड्यात आमिर खानचा ‘पापा कहते हैं’ गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल

या चित्रपटाच्या प्रदर्शना आधीच याने नवे रेकॉर्ड करायला सुरुवात केली. पहिल्या दिवशी या चित्रपटाने ऑफिसवर मोठा गल्ला जमवला. आता त्या पाठोपाठ दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे.

जबरदस्त ऍडव्हान्स बुकिंग नंतर प्रदर्शनाच्या पहिल्या दोन दिवसात या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आपला डंका वाजवला आहे. ट्रेड ॲनालिस्ट तरण आदर्श याने सांगितले की या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी पहिल्या दिवशी पेक्षा ४० टक्क्यांनी जास्त कमाई केली आहे. ‘दृश्यम २’ने प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी २१.५९ कोटींची रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. ‘ब्रह्मास्त्र’नंतर दृश्यम ही एकमेव बॉलीवूड फिल्म आहे जिने प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी २० कोटींहून अधिक रुपयांचा गल्ला जमवला. आता हा चित्रपट या आठवड्याच्या अखेरीस ४० ते ५० कोटींची कमाई करेल असा अंदाज वर्तवला जात आहे.

’दृश्यम २’ चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर १४.५० कोटींचा गल्ला जमवला. त्यापाठोपाठ आता दुसऱ्या दिवशीही या चित्रपटाची जादू कायम राहिली आहे.

हेही वाचा : Photos: ‘अशी’ असेल ‘दृश्यम २’ची कथा, जाणून घ्या चित्रपटाबद्दलची गुपितं

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अभिषेक पाठक दिग्दर्शित ‘दृश्यम २’ हा चित्रपट १८ नोव्हेंबरला थिएटरमध्ये रिलीज झाला. २०१४ साली आलेल्या ‘दृश्यम’ चित्रपटाचा हा पुढील भाग आहे. या चित्रपटाच्या पहिल्या भागाचं दिग्दर्शन निशिकांत कामत यांनी केलं होतं. या चित्रपटात अजयसह श्रिया सरन, तब्बू, इशिता दत्ता यांच्या मुख्य भूमिका होत्या. कमी बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने ६७.१७ कोटी रुपयांचं कलेक्शन केलं होतं. ‘दृश्यम २’ किती कोटींची कमाई करेल हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.