बॉलिवूडचा पुढील जनरेशनचा सुपरस्टार म्हणून रणबीर कपूरकडे फार आशेने पाहिलं जातं. गेल्यावर्षी रणबीरचा ‘शमशेरा’ चांगलाच आपटला पण ‘ब्रह्मास्त्र’ने मात्र सगळं भरून काढलं. ‘ब्रह्मास्त्र’ सुपरहीट झाला आणि काहीच महिन्यात रणबीर आणि अलियाला कन्यारत्न झाल्याची बातमी समोर आली. नुकताच त्याच्या ‘ॲनिमल’ या चित्रपटाचा लूक समोर आला आहे. यावर बरीच चर्चा झाली आहे आता त्याच्या नवीन चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. याच चित्रपटाच्या प्रमोशन निमित्त एका चाहतीच्या कृतीने त्याचे कौतुक होत आहे.

रणबीर कपूरचा चाहतावर्ग मोठा आहे. तो सोशल मीडियावर सक्रीय नसला तरी तो कायम चर्चेत येत असतो. नुकताच तो ‘तू झुटी मै मक्कार’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी एका कॉलेजात गेला होता. त्यावेळी तो स्टेजवर आला. त्याचवेळीस एक चाहती धावत आली आणि त्याला थेट मिठी मारली. तिथे असलेले सुरक्षारक्षक लगेचच आले आणि त्यांनी रणबीरची सुटका केली.

इन्स्टाग्राम लाइव्हच्या माध्यमातून शिव ठाकरेकडे चाहतीने केली विचित्र मागणी; म्हणाली “मला बॉयफ्रेंड…”

सोशल मीडियावर हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एकाने लिहले आहे, मला त्याच्याबद्दल आदर आहे कारण तो खूपच नम्र आहे. दुसऱ्याने लिहले आहे तो खूप नम्र सुपरस्टार आहे. एकीने लिहले आहे माझा नंबर कधी येणार? अशा प्रतिक्रिया येत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, रणबीर-श्रद्धाचा हा चित्रपट ८ मार्च २०२३ म्हणजेच होळीच्या दिवशी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. लव रंजन आणि अंकुर गर्ग ‘तू झूठी मैं मक्कार’या चित्रपटाचे निर्माते असून याचं दिग्दर्शन लव रंजन यांनी केलं आहे.