अभिनेत्री तापसी पन्नू हे गेले काही दिवस सोशल मीडियापासून आणि एकंदरच लाईमलाइटपासून लांब होती. नुकतंच तिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधला ज्यामुळे ती चर्चेत आली. नुकतंच तापसीने सोशल मीडियावर ‘Ask me anything’ असं म्हणत चाहत्यांचे प्रश्न घेतले अन् त्यांना भन्नाट उत्तारं दिली.

याच दरम्यान एका चाहत्याने तापसीला लग्न कधी करणार असा प्रश्न विचारला. या प्रश्नाचं भन्नाट उत्तर दिल्याने तापसी सध्या चर्चेत आहे. तापसी या चाहत्याला उत्तर देताना म्हणाली, “अद्याप मी गरोदर नाहीये त्यामुळे इतक्यात तरी मी लग्नाचा विचार करू शकत नाही. जेव्हा ठरेल तेव्हा मी नक्की सांगेन.” हे उत्तर देताच तापसीला हसू आवरेना अन् ती प्रचंड हसली.

आणखी वाचा : ‘हिडिंबा’चा उलटा ट्रेलर पाहून तुम्हीही व्हाल थक्क! प्रमोशनची हटके ट्रिक चर्चेत

असं उत्तर देऊन तापसीने काही बॉलिवूड अभिनेत्रींवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे असं काहींचं म्हणणं आहे. गेल्या वर्षी सलग ६ चित्रपट देणाऱ्या तापसीने सध्या चांगलाच ब्रेक घेतला आहे. गेले बरेच दिवस ती तिच्या बॉयफ्रेंड आणि त्याची बहीण यांच्याबरोबर सुट्टीची मजा घेत होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
taapsee-post
फोटो : सोशल मीडिया

गेल्या वर्षी तापसीचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकले नाहीत. आता ती राजकुमार हिरानी आणि शाहरुख खान यांच्या ‘डंकी’मध्ये झळकणार आहे. यासाठी ती प्रचंड उत्सुक आहे. याबरोबरच तापसीचे ‘फिर आयेगी हसीन दिलरुबा’ आणि ‘जन गण मन’ हे दोन्ही चित्रपटही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.