पार्श्वगायक आदित्य नारायण गेल्या काही दिवसांपासून खूप चर्चेत आला होता. त्याचा कॉन्सर्टदरम्यानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. ज्यामध्ये आदित्यने एका चाहत्याच्या हातावर माइक मारून त्याचा फोन हिसकावून फेकून दिला होता. गायकाच्या या कृतीने तो खूप ट्रोल झाला होता. अशातच आता त्या चाहत्याला नवीन मोबाइल दिल्याचं समोर आलं आहे. यासंबंधित फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

छत्तीसगढमधील एका कॉलेजमध्ये आदित्य नारायणच्या लाइव्ह कॉन्सर्टदरम्यान ही घटना घडली होती. ज्यानंतर आदित्य माफी मागेल अशी अपेक्षा होती. पण तसं काही झालं नाही. इव्हेंट मॅनेजरने देखील आदित्यची बाजू घेतली. त्यामुळे अखेर त्या संबंधित कॉलजने त्या चाहत्याला नवा मोबाइल घेऊन देण्याचं पाऊल उचललं. कॉलेजकडून त्या चाहत्याला नवा मोबाइल देतानाचा फोटो व्हायरल झाला आहे. नेटकऱ्यांनी कॉलेजच्या या निर्णयाचं कौतुक केलं आहे.

हेही वाचा – “मुजरा फक्त महाराजांना”, शिवजयंतीच्या शुभेच्छा देत रुचिरा जाधवने ‘बिग बॉस’च्या घरातील सांगितला एक प्रसंग, म्हणाली…

एका नेटकऱ्याने या पोस्टवर लिहिलं आहे, “खरंतर ही गोष्ट आदित्य नारायणने केली पाहिजे होती. त्याचं करिअर एवढं झालं नाही, त्यामुळे तो अशा कृती करून बिग बॉसमध्ये जाण्याच्या प्रयत्नात आहे.” तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं, “आदित्यच्या या कृतीविरोधात गुन्हा दाखल केला पाहिजे. “

हेही वाचा – Video: चालू सीनमध्ये जेव्हा अभिनेत्री तेजश्री प्रधान डायलॉग विसरते तेव्हा…, पाहा व्हिडीओ

इव्हेंट मॅनेजर काय म्हणाला होता?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, इव्हेंट मॅनेजर आदित्यची बाजू घेत म्हणाला होता, “तो मुलगा कॉलेजचा विद्यार्थी नव्हता, तो कॉलेजच्या बाहेरचा कोणीतरी असावा. तो सतत आदित्यचे पाय ओढत होता. तो खूप त्रास देत होता. त्याने अनेक वेळा आदित्यच्या पायावर फोन मारला आणि मग आदित्यला राग आला. आदित्यने विद्यार्थ्यांबरोबर जवळपास २०० सेल्फी घेतले असतील. याशिवाय संपूर्ण कॉन्सर्ट सुरळीत पार पडला. या घटनेनंतर हा कार्यक्रम जवळपास दोन तास चालला. या घटनेत तो विद्यार्थी बरोबर असता तर तो पुढे आला असता.”