Natasa Stankovic post after Hardik Pandya Shared photos with Mahieka Sharma : क्रिकेटपटू हार्दिक पंड्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. हार्दिकने नवीन गर्लफ्रेंड माहिका शर्माबरोबरचं त्याचं नातं अधिकृत केलं आहे. त्याने स्वतःच इन्स्टाग्रामवर तिच्याबरोबरचे फोटो पोस्ट केले आहेत. हार्दिकने माहिकाबरोबरचे फोटो पोस्ट केल्यानंतर एक्स पत्नी नताशाच्या पोस्टने लक्ष वेधले आहे.

नताशा स्टँकोविकने इन्स्टाग्रामवर तिचे काही फोटो पोस्ट केले आहेत. ‘Little Outdit Diary’ असं लिहून तिने हे फोटो पोस्ट केले आहेत. यात ती वेगवेगळ्या कपड्यांमध्ये मिरर सेल्फी काढताना दिसतेय. नताशाने हे फोटो पोस्ट करताना ‘ऑर्डिनरी गर्ल’ हे गाणं वापरलंय. हार्दिकने माहिकाबरोबरचं नातं इन्स्टाग्रामवर अधिकृत केल्यानंतर नताशाची ही पोस्ट चांगलीच व्हायरल झाली आहे.

जीन्स व टॉप तसेच वेगवेगळ्या आउटफीटमधील फोटो नताशाने इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. नताशाच्या या पोस्टवर चाहते लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.

नताशाची पोस्ट

नताशाच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कमेंट्स केल्या आहेत. ‘नताशासारखं कुणीच नाही’, ‘हार्दिक तुला डिझर्व्ह करत नाही’, ‘ती स्वतःला अपग्रेड करण्यात, एका मुलाला चांगल्या पद्धतीने वाढवण्यात व्यग्र आहे. तर तिचा एक्स पती एकामागून एक वेगवेगळ्या मुलींसोबत फिरतोय, तरीही लोक महिलेलाच दोष देतात, आणि शेवटी कोण दोषी आहे ते सर्वांना दिसतंय.’ ‘सुरुवातीपासूनच मला माहित आहे की नताशा चांगली आहे.’ ‘नताशा तू काहीच न बोलता पुढे जाण्याचा निर्णय घेतलास! किती अपग्रेडिंग महिला आहेस,’ ‘आम्ही सगळे चाहते तुमची माफी मागतो मॅम, तुमच्याविरुद्धच्या प्रत्येक वाईट गोष्टीबद्दल माफी मागतो…आम्ही वास्तविकता पाहू शकलो नाही,’ अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी नताशाच्या व्हिडीओवर केल्या आहेत.

Natasa Stankovic post after Hardik Pandya Shared photos with Mahieka Sharma(1)
नताशाच्या पोस्टवरील नेटकऱ्यांच्या कमेंट्स (सौजन्य- इन्स्टाग्राम)

हार्दिक पंड्या व नताशा यांचा २०२४ मध्ये घटस्फोट झाला. दोघांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट करून विभक्त झाल्याची माहिती चाहत्यांना दिली होती. हार्दिक व नताशाला अगस्त्य नावाचा मुलगा आहे. त्याचा सांभाळ नताशा करतेय. त्याचबरोबर हार्दिकही अगस्त्यसोबत वेळ घालवत असतो.

घटस्फोटानंतर हार्दिकचं नाव जास्मिन वालियाशी जोडलं गेलं होतं. दोघांचे काही फोटो खूप व्हायरल झाले होते. त्यानंतर जास्मिन व हार्दिक यांनी एकमेकांना अनफॉलो केलं. आता हार्दिकने माहिकाबरोबरचे फोटो पोस्ट करून नातं अधिकृत केलं आहे. माहिकाने हार्दिकचा एक फोटो पोस्ट करून त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.