बॉलिवूडचा बादशाह अर्थात शाहरुख खान विविध कारणांनी चर्चेत येत असतो. सध्या त्याच्या ‘पठाण’ चित्रपटाची हवा आहे. त्याचा हा चित्रपट २५ जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. अवघ्या काही तासातच लाखो लोकांनी हा ट्रेलर पहिला आहे. शाहरुख खानचे चाहते त्याच्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. अशातच शाहरुख खानने आज ट्विटरवर “आस्क एसआरके” सेशन ठेवलं होतं.

“आस्क एसआरके” सेशनमध्ये शाहरुख खानने चाहत्यांना त्याला प्रश्न विचारण्यास सांगितलं होतं. चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची शाहरुख खानने उत्तरं दिली. त्याच्या चाहत्यांनी त्याला अनेक प्रकारचे प्रश्न विचारले होते. ज्यात एकाने विचारले की, “पठाण चित्रपटासाठी किती मानधन घेतलेस?” त्यावर शाहरुखने उत्तर दिले की “का? पुढील चित्रपटात घेणार आहेस का?” असा रिप्लाय त्याने दिला आहे.

विश्लेषण : सिद्धार्थ-रश्मिकाचा ‘मिशन मजनू’ १९७१ च्या भारत पाक युद्धावर आधारित? जाणून घ्या

शाहरुख खान सध्या या चित्रपटाच्या प्रमोशन निमित्त विविध ठिकाणी फिरत आहे. मात्र चित्रपटाला याआधी बराच विरोध झाला आहे. त्यातील गाणी आणि एकूणच तो चित्रपट बॉयकॉट करायची मागणी सोशल मीडियावर जोर धरू लागली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या चित्रपटातून शाहरुख खान तब्बल चार वर्षांनी मोठ्या पडद्यावर मुख्य भूमिकेत पुनरागमन करतोय. यापूर्वी तो रणबीर कपूरच्या ‘ब्रह्मास्त्र’मध्ये एका वैज्ञानिकाच्या भूमिकेत दिसला होता. या चित्रपटात शाहरुख खानबरोबर दीपिका पदुकोण, अब्राहम दिसणार आहेत. यशराज फिल्म्सचे याची निर्मिती केली आहे.