scorecardresearch

“अरे काय हे..!”, आमिर खानला पाहून चाहते निराश

नुकतेच ‘सलाम वेंकी’ या चित्रपटाचे स्पेशल स्क्रिनिंग झाले. या स्क्रिनिंगच्या वेळी आमिर खानने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

“अरे काय हे..!”, आमिर खानला पाहून चाहते निराश

अभिनेत्री काजोलचा आगामी ‘सलाम वेंकी’ या चित्रपट चर्चेत आहे. तिच्या या चित्रपटात अभिनेता आमिर खानही पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. नुकतेच मुंबईत या चित्रपटाचे स्पेशल स्क्रिनिंग आयोजित करण्यात आले होते. या चित्रपटाच्या स्क्रिनिंगला बॉलिवूडचे सर्व स्टार्स उपस्थित होते. पण यावेळी आमिर खानला पाहून चाहते निराश झाले आहेत.

या स्क्रिनिंगच्या वेळी आमिर खान हा त्या कलाकारांपैकी एक होता ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्याने काळ्या रंगाचा टी-शर्ट, डेनिम जॅकेट आणि मॅचिंग ट्राउझर्स परिधान केली होती. त्यावर त्याने चष्माही घातला होता. या लूकबरोबर त्याने त्याचे केस आणि दाढी न रंगावता ते पांढरंच ठेवलं होतं. पण त्याला अशा लूकमध्ये पाहून त्याचे चाहते त्याला नकारात्मक प्रतिक्रिया देऊ लागले आहेत.

आणखी वाचा : अक्षय कुमार नाही तर ‘हे’ अभिनेते आहेत सर्वाधिक मानधन घेणारे भारतीय कलाकार

त्याचा हा लूक पाहून एक चाहता म्हणाला, “आपल्या आवडत्या अभिनेत्याला म्हातारा होताना पाहून वाईट वाटतं.” तर दिसऱ्याने लिहीलं, “दाढी कर…तरुण दिसशील.” त्याचा हा लूक त्याच्या चाहत्यांना अजिबात आवडलेला नाही. मध्यंतरीही आमिर खानच्या तब्येतीवरून त्याला ट्रोल केलं गेलं होतं. त्यावेळीही त्याला अनेकांनी म्हातारा म्हणून संबोधलं होतं.

हेही वाचा : Video: “तू खोटारडी…”; अमिताभ बच्चन यांनी काजोलबद्दल केलेलं वक्तव्य चर्चेत

दरम्यान त्यांचा ‘सलाम वेंकी’ चित्रपटाचं दिग्दर्शन रेवती यांनी केलं आहे. काजोल आणि राजीव खंडेलवालबरोबर विशाल जेठवा, आहाना कुमरा, प्रकाश राज या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसतील. तर आमिर खान पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘सलाम वेंकी’ हा तरुण बुद्धिबळपटू कोलावेन्नू वेंकटेशच्या सत्य कथेपासून प्रेरित आहे. त्याला ड्यूचेन मस्क्यूलर डिस्ट्रॉफी या आजाराचे निदान झाले होते आणि २००४ मध्ये त्यांचे निधन झाले होते. हा चित्रपट ९ डिसेंबरला थिएटरमध्ये रिलीज होत आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-12-2022 at 12:47 IST

संबंधित बातम्या